Download App

Video : सभागृहात बंधने आली तर… रास्ता तो मेरा है; नाराज भुजबळांनी अखेर रान पेटवलचं

  • Written By: Last Updated:

नाशिक : मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या नाराज छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) अखेर मेरा वक्त भी आयेगा और तेरी राय भी बदलेगी म्हणत आता न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली आहे. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असून, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मला पाडण्यासाठी खूप प्रयत्न झाले, 60-70 मतं कमी झाली, असं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. ते नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी आपण राज्यभर फिरणार असल्याचे सांगत सर्व ओबीसी समाज एकत्र राहिला तर आम्ही सेफ आहोत असे म्हटले आहे. (Chhagan Bhujbal Nashik Melava)

Video : छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात

मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे. यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नसून, घाईघाईने कोणतेही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे असे आवाहन भुजबळांनी उपस्थितांना केले. यापुढे आणखी संकटे येतील असे सांगत त्यासाठी पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पुकारावा लागेल असे भुजबळ म्हणाले.

मी अजित पवारांच्या हातातील खेळणं आहे का?; खडेबोल सुनावतं नाराज भुजबळ कडाडले…

ही लढाई आमदार म्हणूनच लढणार

उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, ही लढाई मी आमदार म्हणूनच सभागृहामध्ये लढणार असून, तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट भुजबळांनी अजितदादांचे नाव न घेता दिला आहे. यावेळी नाशिक लोकसभेसाठी मोदी आणि शाह यांनी माझं नाव घेतले होते. मात्र, माझ्या विरोधात मिटिंगा झाल्या अशा खळबळजनक खुलासादेखील भुजबळांनी यावेळी केला.

काय म्हणाले भुजबळ?

मी काल नाशिक आणि येवला येथील लोकांशी बोललो. सगळ्यांना शॉक बसला आहे फक्त नाशिक आणि येवला मधेच नाही सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे. देशातून आमच्याकडे या म्हणून मला फोन आणि मेसेज सुरू असून, शांत बसलेले सगळेजण पेटून उठले आहेत. मात्र, पेटून उठलात तरी पेटवा पेटवी करू नका हिंसक आंदोलन नको असे आवाहन भुजबळांनी समर्थकांना केले. दलित, मागासवर्गीय, ओबीसी जसे आपल्यासोबत आहेत तसे मराठा समाजातील नागरिकदेखील आपल्या सोबत आहेत. सगळेच आपले दुष्मन नाहीत आम्हाला संपवण्यासाठी निघालेल्याना आमचा विरोध आहे.

मला मंत्रिपदाची आस नाही, जर असती तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबड च्या सभेला आलो नसतो. फक्त लाडकी बहीणीमुळे आमदार निवडून नाही आले. काही लोकांना लाकडी बहीणमुळे आमदार निवडून आले असा भ्रम झाला आहे मात्र इतर गोष्टी पण आहेत असा अप्रत्यक्षपणे टोलादेखील भुजबळांनी अजितदादांना लगावला. जो निर्णय मकरंद पाटील यांना दिला मग मला का नाही असा खडा सवालदेखील भुजबळांनी अजित पवारांना विचारला. तसेच मला आता राज्यसभेवर पाठवायचे होते तर मग निवडणूक कशाला लढवायला लावली.

follow us