Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तब्बल 61 तासांनंतर किणी टोल नाक्यावर सुरु असणारा चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ऊसाला पहिली उचल 3, 900 रुपये देण्यास कारखाननदारांनी सहमती दिल्यानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे. तसेच साखरेच्या दरात वाढ झाल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम देण्याचाही तोडगा चर्चेदरम्यान काढण्यात आला आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ऊसदराच्या मागणीवरुन आंदोलनाची सुरुवात केली होती. संघटनेकडून सुरुवातीला 4,500 रुपये देण्याची मागणी केली होती मात्र चर्चेनंतर 4, 200 रुपयांपर्यंत तोडगा काढण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे आणि कारखानदारांकडून पहिली उचल 3, 900 रुपये देण्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, साखरेचा दर 4, 500 रुपयांच्या पुढे गेल्यास वाढव दरातून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेत शेतकऱ्यांना 70 टक्के हिस्सा मिळणार आहे. तर कारखान्यांना 20 टक्के हिस्सा देण्याचं ठरलं आहे. कारखानदारांनी सुरुवातीला 3, 800 रुपये आणि त्यानंतर 200 रुपये देण्याचा प्रस्ताव दिला होता मात्र संघटनेने मांडलेल्या भूमिकेनंतर चर्चेत बदल झाला आणि पहिली उचल 3, 900 रुपये देण्याच्या आश्वासनासह पुढील दरवाढीचं गणितही ठरले असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
शरद पवार एनडीएसोबत जाणार अन् सुप्रिया सुळे मंत्री होणार? संजय राऊत म्हणाले… –
तसेच कोल्हापूरमध्ये ठरलेला हा फॉर्म्युला सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील कारखानदारांसोबतच्या चर्चेतही मांडण्यात आला असून जर तिथे अंमलबजावणी झाली नाही तर त्या जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र्य आंदोलन केलं जाईल असा इशाराही यावेळी राजू शेट्टी यांनी दिला.
