Download App

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात चार-पाच दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता कठीण

Monsoon Updates : 15 मे च्या सुमारास भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितले होते की मान्सून (Monsoon) भारताच्या भूमीत म्हणजेच केरळमध्ये 4 जून रोजी दाखल होईल. मात्र आज 6 जून उजालडी, तरीही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जून रोजी राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. देशात मान्सूनचा प्रवेश अद्याप जाहीर झाला नसल्याने येत्या चार दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता कठीण आहे. मात्र, आठवड्याच्या अखेरीस कोकणात मान्सूनपूर्व पाऊस (Pre-monsoon rains) पडू शकतो. (It will take more time for monsoon to arrive in Kerala)

भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये मान्सून सुरू होण्याचा अद्ययावत अंदाज सोमवारी जारी केलेला नाही. अशा परिस्थितीत 6 जून रोजी देशात मान्सून दाखल होईल का, याबाबत साशंकता आहे. भारतीय हवामान खात्याने 4 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. या अंदाजानुसार, मान्सूनच्या आगमनाची तारीख चार दिवसांनी पुढे-पुढे सरकू शकते. त्यामुळे 8 जूनपर्यंत मान्सून सुरू होण्याची शक्यता असली तरी 9 जूनला पाऊस महाराष्ट्रात दाखल होणार नाही.

Wrestlers Protest : न्यायासाठी नोकरी अडथळा असेल तर… कुस्तीपटू बजरंग पुनियाने ठणकावून सांगितलं

अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील २४ तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील ४८ तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला.

हा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे क्षेत्र उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. या संदर्भात, नैऋत्य मान्सूनचे आगमन मंगळवारी तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा मार्ग यावर अवलंबून आहे, असेही सांगितले जाते.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. एम. राजीवन म्हणाले, ‘7 ते 8 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र सुरुवातीला उत्तरेकडे सरकण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे मान्सूनचा प्रवाह तीव्र होऊ शकतो आणि मान्सूनची प्रगती पुन्हा सुरू होऊ शकते. हे मॉडेल 8 जून दरम्यान केरळमध्ये चांगल्या पावसाची शक्यता दर्शवते, असं त्यांनी सांगितलं.

वादळा विषयी भिन्न अंदाज

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता काही हवामानशास्त्रीय मॉडेल्सने वर्तवली आहे. तथापि, दोन भिन्न मॉडेल्सद्वारे वादळाचा ट्रॅक वेगळ्या पद्धतीने दर्शवल्याने मान्सूनची प्रगती वेगाने होईल की, त्यात खंड पडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कमी दाबाचे क्षेत्र कसे विकसित होते यावर आयएमडी सतत लक्ष देत आहे. आयएमडीने सांगितले की, आम्ही त्यात वेळोवेळी होणारे बदल प्रकाशित करू.

Tags

follow us