Download App

Chandrakant Patil : ‘देवेंद्र फडणवीस हे अतिशय धूर्त राजकारणी’

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी (Kasba by-election)  मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मनसेमध्ये कसब्याची पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या होती. मात्र, असं असताना देखील त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन नवी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. मात्र, मनसे कोणत्याही प्रकारच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (MNS President Raj Thackeray) हे कसब्यामध्ये भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी येणार का? यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे खूप धूर्त आणि हुशार राजकारणी आहेत. कुठल्या स्टेपला काय करायचं हे त्यांना चांगलं कळतं. अजूनही आठ दिवस बाकी आहेत. त्यामुळे त्यांना जर वाटलं तर ते राज ठाकरेंना आवाहन करतील.’

‘कसब्याच्या नागरिकांनो संजय राऊत तुम्हाला तुम्ही सुजाण नाहीत असे म्हणतात’

कसबा पोटनिवडणुकीमध्ये कसब्यातील नागरीक हे नोटाला मतदान करणं पसंत करतील. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पाटलांनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला. ‘कसब्याच्या नागरिकांवर राऊत अविश्वास दाखवत आहेत. मात्र, कसब्याचे नागरिक सुजाण आहेत आणि जागरूक आहेत. भाजप वर्षानुवर्ष लोकांच्या मागे कसा उभा राहिला आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे सुजान नागरिक नोटाकडे जाणार नाहीत. संजय राऊत कसब्याच्या नागरिकांना ते सुजाण नाहीत असे म्हणतात, असं पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे, याची माहिती देण्यासाठी देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. पर्यटन विभागामार्फत राज्यातील महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.

आव्हाडांच्या मुलीला शूट करायचं आणि जावयाला उडवायच : कॅलिपमधील संभाषणाने खळबळ

या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘शिवकालीन गाव’हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

असे असणार तीन दिवस चालणारे कार्यक्रम

दि. १८ फेब्रुवारी २०२३

सायं. ६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन

सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ कार्यक्रम

 

दि. १९ फेब्रुवारी २०२३

स. ९ ते ११ वा. किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा

दु. ३ ते ५ वा. शिववंदना

सायं. ६:१५ ते ७ वा. महाआरती कार्यक्रम

सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम

 

दि.२० फेब्रुवारी २०२३

सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम

Tags

follow us