सातत्याने माझी इमेज ही ब्राह्मण विरोधी असल्याची प्रोट्रेट केली जाते. हे साफ चुकीचं आहे. कारण माझी बायकोच ही कोकणस्थ आहे. मग तुम्हीच सांगा, तरीही मी ब्राह्मण विरोधी कसा होतो? अशी भूमिका भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली.
यावेळी गेल्या काही दिवसापासूनच्या अनेक प्रश्नांना चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिली. त्यावेळी ते म्हणाले की सातत्याने माझी इमेज ही ब्राह्मण विरोधी असल्याची प्रोट्रेट केली जाते. हे साफ चुकीचं आहे. कारण माझी बायकोच ही कोकणस्थ आहे. मग तुम्हीच सांगा, तरीही मी ब्राह्मण विरोधी कसा होतो? असा प्रश्न त्यांनी केला.
Sanjay Shirsat यांचा ठाकरेंना इशारा… तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावेन!
यावेळी त्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मेधा कुलकर्णी यांच तिकीट कापल्याच्या आरोपावरही उत्तर दिलं. ते म्हणाले की २०१९ साली कोथरूडमधून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकिट कापून ब्राह्मणांवर अन्याय आरोप केल्याचा सातत्याने केला जातो हे साफ चुकीचं आहे.
ते पुढे म्हणाले की २०१९ साली खरंतर मी कोल्हापुरातून लढण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यावेळीचे कोल्हापुरातील ४ मतदारसंघातील निवडणूक पूर्व सर्वे देखील माझ्याच बाजुने होते. पण तत्कालीन राजकीय रणनितीचा भाग म्हणून पक्षश्रेष्ठींनी मला कोथरूडमधून लढण्याचे आदेश दिले म्हणून मला पुण्यात यावं लागलं, असं स्पष्टीकरण त्यांनी या मुलाखतीमध्ये दिलं.
मविआच्या संयुक्त सभेच्या टीझरमधूनही राहुल गांधी गायब…
२०१९ साली सर्व पुणे लोकसभा मतदारसंघासाठीचा सर्वे हा अनिल शिरोळे यांच्या बाजुने असतानाही आम्ही गिरीश बापटांना खासदारकीचं तिकिट दिलंच ना, मग तो मराठ्यांवरचा अन्याय नाही का? त्यावेळी आम्ही हा विचार केला नाही. कारण त्यावेळी आम्ही विचार केला की गिरीश बापट हे पाच वेळा आमदार होते तर त्यांना लोकसभा निवडणुकीची संधी दिली पाहिजे, हा विचार करून आम्ही त्यांना उमेदवारी दिली.
तसंच ते पुढे म्हणाले की पुण्यातून भाजपचा पहिला महापौर होण्याचा बहुमान मुक्ताताई टिळकांना दिलाच नाही त्यावेळीही मुरलीधर मोहोळ स्पर्धेत होतेच की!!! अर्थात नंतर त्यांनाही महापौर पद मिळालेच पण पहिला मान पक्षाने मुक्ताताईं टिळकांनाच दिला हे कसं विसरुन चालता येईल? थोडक्यात भाजपात क्षमता पाहूनच संधी दिली जाते.
निवडणुका कधीही होतील, तयार राहा ; जयंत पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आदेश