मविआच्या संयुक्त सभेच्या टीझरमधूनही राहुल गांधी गायब…
संभाजीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करणं चांगलच भोवलं आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळण्यात आलं आहे. टीझरमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेसविरहीत नेत्यांनी राहुल गांधींच्या फोटोला डावलण्यात आल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता सावरकरांवर टीका केल्यानेच राहुल गांधींचा फोटो टीझरमध्ये नसल्याचा सूर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतोय.
राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अजित पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले यांनी राज्यभरात सत्ताधारी सरकारविरोधात संयुक्त सभा घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर ही पहिलीच संयुक्त सभा छत्रपती संभाजीनगरमधून होणार आहे. येत्या 2 एप्रिल रोजी ही सभा पार पडणार आहे. सभेआधीच महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
…तर आम्ही महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, राहुल गांधी वादात हिंदू महासभेची उडी
महाविकास आघाडीने प्रदर्शित केलेल्या टीझरमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, यांचे फोटो दिसत आहेत. टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचादेखील फोटोचा उल्लेख आहे मात्र, सावरकरांवर टीका करणारे राहुल गांधी यांचा फोटो या टीझरमध्ये नाही. त्यामुळे आता सावरकरांवर टीका केल्याच्या प्रकरणामुले राहुल गांधी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना नको आहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
Bilkis Bano Case आरोपींच्या सुटकेवरून सर्वोच्च न्यायालायाने गुजरात सरकारला फटकारले
एकंदरीत या संपूर्ण प्रकरणार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. सभेच्या टीझरमध्ये राहुल गांधी यांचा फोटो दिसत नसल्याचा दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण अंबादान दानवेंनी दिलं आहे. तसेच राहुल गांधी टीझरमध्ये नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरणार असून या संयुक्त महाराष्ट्रात होणार असल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार, उद्धव ठाकरे अन् काँग्रेसचे नेते नाना पटोले सभांना उपस्थित राहणार आहेत. यांच्यासह शरद पवार, सोनिया गांधी, आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. हा टीझर सुटसुटीत बनवला असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आगामी काळात आणखीन संयुक्त सभा महाराष्ट्रात होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेसाठीच्या टीझरमध्ये सर्वच नेत्यांचे फोटो टाकणे शक्य नव्हतं. हा पहिला टप्पा असून आणखी बरेच टीझर प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीमधील इतर नेते असणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढील सभांच्या टीझरमध्ये राहुल गांधींचा फोटो टाकणार असल्याचे संकेत अंबादास दानवे यांनी दिले आहेत.