…तर आम्ही महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, राहुल गांधी वादात हिंदू महासभेची उडी

  • Written By: Published:
…तर आम्ही महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, राहुल गांधी वादात हिंदू महासभेची उडी

राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ, अशी आक्रमक भूमिका हिंदू महासभेचे नेते आनंद दवे यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसापासून देशात राहुल गांधी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे, त्यात आनंद दवे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नवा वाद निर्माण होण्याची शकयता वर्तवली आहे.

यावेळी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दवे यांनी थेट महात्मा गांधींवर टीका केली. दवे म्हणाले की राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर ठेऊ. भारताची झालेली फाळणी, हिंदूंचा झालेला नरसंहार यांची पुस्तके प्रसिद्ध करु, काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत, असे वक्तव्य आनंद दवे यांनी केले.

खोक्यांची टीका अंगलट; दिल्ली उच्च न्यायालयाचे ठाकरे पित्रापुत्रासह राऊतांना समन्स

दुसरा गोडसे परवडणार नाही

यावेळी दवे यांनी इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधी यांना अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला असता तर त्यांनी अशी वक्तव्य केली नसती. कारण इंदिरा गांधींनी ११ हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती.

ते पुढे म्हणाले की या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही. कारण गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले, असं आमचं म्हणणं आहे. राजकीय पक्षाच्या उद्दीष्टांसाठी कोणाला टार्गेट ठेवणं बरोबर नाही, सावरकारंवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, यामुळे राहुल गांधी वारंवार त्यांच्यांवर टीका करत आहे, असे दवे म्हणाले.

https://letsupp.com/national/up-gangster-atique-ahmad-pryagraj-court-28731.html

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांचे आभार मानतो, आम्ही सर्व एकत्र काम करू. असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी माफी मागणार का ? या प्रश्नावर ते म्हणाले- गांधी कधीही दिलगिरी व्यक्त करीत नाहीत. मी सावरकर नाही

follow us
  • fb
  • instagram
  • youtube