राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

राघव चड्डा आणि परिणीती चोप्राचा साखरपुडा झाला? ‘आप’ खासदाराच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण

Parineeti Chopra Raghav Chadha: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटींगच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. दोघेही मुंबईत सलग दोन दिवस लंच आणि डिनर डेटवर दिसून आले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनीही ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले आहे.

खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांचे अभिनंदन केले आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोरा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे फोटो शेअर करताना ट्विटमध्ये लिहिले की, “मी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या पुढील आयुष्यासाठी प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा.”

चर्चांना उधाण

अलीकडेच बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर त्यांचे काही फोटो स्पॉट झाले होते. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.एका व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा आप खासदार राघव चढ्ढा यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली होती. मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीचे नाही, असे तो म्हणाला होता.

“एक महिलेने मला…”, रवी किशनचा कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा!

या वर्षी जानेवारीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनाही ‘इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला आहे. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे परिणीती चोप्राने यूकेच्या मँचेस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तर राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube