Download App

… म्हणून काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना कधीही जिंकू दिले नाही; बावनकुळेंचं सूचक विधान

Chandrasekhar Bawankule on prakash ambedkar: काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीही विजयी होऊ दिलं नाही, त्यांच्या पक्षाला साथ दिली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या निवडणुकीत लढवल्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व जर पुढे आलं, तर काँग्रेस पार्टीला भीती आहे. म्हणून त्यांना युतीत घेत नाही. ते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहे, असे सूचक विधान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी यावेळी केले आहे.

बारामतीची जागा ही महायुतीतील तिन्ही नेते तसेच केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार देईल, त्याला 51 टक्के मत घेऊन महायुती तो उमेदवार विजयी करून आणू. उद्या निवडणुका झाल्या तरी आम्ही बारामतीची जागा जिंकू. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांना कधीही विजयी होऊ दिलं नाही, त्यांच्या पक्षाला साथ दिली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भंडाराच्या निवडणुकीत लढवल्याचा इतिहास काँग्रेसचा आहे. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व जर पुढे आलं, तर काँग्रेस पार्टीला भीती आहे. म्हणून त्यांना युतीत घेत नाही. ते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात आहे.

कंत्राटी तरी भरतीचा निर्णय आमच्या सरकारने रद्द केला आहे. ही अभिनंदनीय बाबा आहे. उद्धव ठाकरे यांनी त्या जीआरवर सही केली, ती त्यासाठी आमच आंदोलन आहे. कंत्राटी कामगार नेमताना ९ कंपन्या उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या होत्या. त्या कामगारांना निवड करताना सर्वाधिक रेट देऊन महाराष्ट्राला लुटण्याच काम उद्धव ठाकरे यानी केले आहे, असा जोरदार हल्लाबोल यावेळी केला आहे.

शिंदे-लंकेंचा ‘तो’ प्रवास म्हणजे महायुती बळकटीचे उदाहरण…विखेंचा खोचक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आणि पुण्यात आले होते. 75 हजार कोटी रुपये दिले. हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अडीच वर्षात केले नाही, त्यांना पंतप्रधानांची एलर्जी होती. जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, तेव्हा तेव्हा हजारो कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी देऊन गेले. आताही शिर्डीला येणार आहे, त्याविषयी मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी देतील आणि महाराष्ट्र नंबर 1 वर आणण्यासाठी निधी देत आहेत. नितीन गडकरी काय बोलले मला माहित नाही. मात्र, जे बोलले असतील ते योग्य बोलले असतील, असे यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने काही ऑब्झर्वेशन काढलं असेल तर त्यावर सुप्रीम कोर्टचे ऑब्झर्वेशन क्लिअर करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. ज्यूडीशीयल केस असल्यामुळे हे का नाही? ते काय नाही? असे प्रश्न करणे योग्य नाही. सरकारने प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली. या मराठा समाजाचे आरक्षणाला भाजपचा पाठिंबा आहे.

हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सल्लागार समिती ठरवत असते. आता दहा दिवसाचं कामकाज ठरवलं. सल्लागार समितीला जर आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला वाटलं तर कामकाज वाढवता येते. आमची मागणी आहे 15 दिवस कामकाज चालले पाहिजे. ठाकरे काहीतरी बडबडत असतात. शिवसेनेचा पदाधिकारी इतक्या मोठ्या केसमध्ये सहभागी आहे. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण माहिती, ललित पाटीलचे किती पायामुळे खोल आहे. उद्धव ठाकरे जरा वाट बघा तपासातील खुलासा देवेंद्र फडणवीस लवकरच करतील.

Tags

follow us