Chandrashekhar Bavankule on case not filled against Parth Pawar in Ko dhava Land : पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत आले आहेत. याप्रकरणामध्ये नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. त्यात आता या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल होणार का? त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
जे रजिस्टर कार्यालयामध्ये जे सही करणारे, लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये पार्थ पवार नाहीयेत, त्या कंपनीचे कोण कोण भागिदार आहेत, हा कंपनीचा नियम वेगळा आहे. अजितदादांनी याबाबत स्पष्ट केलं आहे.त्यामुळे त्या आरोपावर चर्चा करण्यापेक्षा चौकशी होऊ द्या.
कोरेगाव पार्कातील जमीन घोटाळा प्रकरणाला वेगळं वळण; पार्थ पवारांबाबत पुणे CP नी काय सांगितलं?
अजित पवारांनी जे म्हटलं ते त्यांना माहिती, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न तर महसूल खात्याने प्राथमिक अहवाल आला त्या आधारे तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी, मुद्रांकाचे डॉक्युमेंट्स तयार करणारे, कंपनीचा मालक असेल खरेदी विक्री करणारे असतील. नोंदणीच्या वेळी ज्यांनी सही केल्या ते पहिल्या टप्प्यात जे आम्हाला आढळले त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
Video : कर्मा रिपीट्स, जरांगे फार महागात पडणार धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर
सखोल चौकशी केल्यावर गुन्हे दाखल होतील. आता प्राथमिक चौकशीत जे दोषी वाटले त्यावर निलंबनाची कारवाई आणि गुन्हे दाखल केले आहेत, आता चौकशी आमच महसूल खातं करतील खारगे समितीचा रिपोर्ट आल्यावर कारवाई करणार पुढच्या टप्प्यात समितीचा अहवाल आल्यावर कारवाई करेल. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेत पाच सदसीय समिती झाली आहे आणि एक महिन्याच्या आत अहवाल सादर करेल. जे काही आरोप झाले त्याची सविस्तर चौकशी करून मग अंतिम निर्णय करू
पुरावे नसतानाही बातम्या चालवतात अन्… मंत्री चंद्रकांत पाटील भडकले
प्राथमिक चौकशीत रजिस्टर कार्यामध्ये जे लिहून घेणारे आणि लिहून देणाऱ्या पार्थ पवार नाही. लिहून घेणारे आणि देणारे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अजित पवार यांनी स्पष्ट केल आहे त्यामुळे त्या आरोपावर पत्र करण्यापेक्षा चौकशी होऊ द्यावी चौकशीचा रिपोर्ट महिनाभरात येईल.
