Download App

ते पत्र नाहीच; ते फक्त एक पान; बावनकुळेंच्या स्पष्टोतीने पंकजांसह अनेकांचे टेन्शन वाढलं

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्यासह अनेकांची नावे आहेत.

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

नागपूर : लोकसभेनंतर राज्यामध्ये विधान परिषदेच्या (Vidhan Parishad ) निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. यामध्ये आता भाजपकडून (BJP) विधान परिषदेसाठी काही नावांची यादी (Candidate List) केंद्र सरकारकडे पाठवल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हायरल यादीवर अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर मात्र, यादीत नावं असणाऱ्या पंकजा मुंडेंसह अन्य नेत्यांची धाकधीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Instagram Down : यूजर्सला रिल्स ऐवजी दिसत आहेत कार अन् निसर्गाचं चित्र

ते फक्त एक पान…

“भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत 20 हून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे. कुणीतरी खोडसाळपणा केला आहे. ते पत्र नाहीच; ते एक फक्त पान आहे. कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे. त्यामुळे त्याला काही अर्थ नाही. त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधानपरिषदेसाठी चांगले उमेदवार देईल. महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगली नावे महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील. निवडणुकीसाठी काही लोकं अंदाज बांधतात, त्यातून याद्या तयार होतात,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेनंतर शिंदेंनी जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना

व्हायरल होणाऱ्या यादीत कुणा-कुणाची नावे?

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक. यांच्या नावाचा समावेश आहे.

विधानसभेच्या सदस्यांतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी विधानपरिषदेची ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार असून याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेल्या विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ येत्या 27 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

ते पत्र नाहीच; ते फक्त एक पान; बावनकुळेंच्या स्पष्टोतीने पंकजांसह अनेकांचे टेन्शन वाढलं

या निवडणुकीसाठी 25 जून रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर 3 जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतदान झाल्यानंतर याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत.

follow us

वेब स्टोरीज