मुंबई : अजितदादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये असे विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. यावेळी भुजबळांनी विधानसभेला भाजपने 80-90 जागा देण्याचा शब्ददेखील दिला असल्याची आठवण करून दिली. ते राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर (Ajit Pawar) महत्त्वाची मागणी केली आहे. (Chhagan Bhujbal On Vidhan Sabha Election Seat Shearing In Mahayuti)
पवारांनी सुरू केलेला खेळ त्यांनीच संपवावा; अमित शाहंचे अति महत्त्वाचे विधान
त्यांना आताच सांगून टाका
बैठकीत बोलताना भुजबळ म्हणाले की, महायुतीमध्ये आपल्याला विधानसभेसाठी योग्य तो वाटा मिळाला पाहिजे. आपण आलो तेव्हा भाजपनं आपल्याला 80-90 जागा मिळतील असे सांगितले होते. पण, लोकसभेसाठी जी काही खटपट झाली ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. त्यामुळे अजित पवार गटाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजे हे भाजपला ठासून सांगावं लागेल. आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे जागा दिल्या तर, त्यातील 50 ते 60 जागा निवडून येती असेही भुजबळ म्हणाले. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच त्यांना सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले.
तीन लाख रुपये घेतले, अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले… ‘असं फुटलं ससूनच्या डॉक्टरांचे बिंग’
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या. 2019 मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
संविधान बदलणार नाही
भाजपनं 400 पार जागांवर विजय मिळवला तर, संविधान बदलले जाईल असा चुकीचा संदर्भ देत विरोधकांकडून दलित समाजावर बिंबवण्यात आले. पण, असेही काहीही होणार नसून, संविधान बदलेले जाणार नसून, हे संपत नाही तोच आता विरोधकांकडून मनुस्मृती प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हे सर्व पराभव दिसत असल्याने दिशाभूल करण्यासाठी केले जात असून, देशात आणि राज्यात विकासकामे जोरात सुरू आहेत.