जालना : आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे. आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला दुःख असेल तरीसुद्धा आपण गप्पा जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्यामुळे आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करुन घ्यायचं, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना जालना जिल्ह्यातील अंरतवाली सराटी गावातून बोलत होते. (Chhagan Bhujbal from Manoj Jarange’s antravali Sarati village opposes Kunbi certificate)
छगन भुजबळ म्हणाले, आपलं दुःख असेल तर बोलायला पाहिजे. आपल्यावर अन्याय होत असेल, आपल्याला दुःख असेल तरीसुद्धा आपण गप्पा जर राहिलो तर त्याला कोणी डॉक्टर भेटणार नाही, त्याला कोणी औषध देणार नाही. त्यामुळे आता एवढी दहशत माजवायची आणि जे पाहिजे ते करुन घ्यायचं. खरोखरच कुणबीतून निजामकालीन पुरावे सापडले तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या, यासाठी आमची हरकत नव्हती. पण आधी पाच हजार, मग दहा हजार, मग झाले पंधरा हजार आणि आता महाराष्ट्रभर होत आहे.
म्हणजे समोरच्या दारातून प्रवेश मिळत नाही, म्हणून मागच्या दारातून ओबीसीमध्ये येण्याचा हा कार्यक्रम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण वेगळं आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका. कारण आमच्या जवळजवळ 375 जाती आणि 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने साखळी उपोषण, उपोषण या माध्यमातून एकत्र या आणि या गोष्टीला विरोध करा. वेगवेगळे आवाज आले तर तुमच्या लेकराबाळांचं भविष्य धोक्यात येईल. त्यामुळे एकत्र रहा आणि विरोध करा. यासाठी सरकार असेल तरी सरकारच्या विरोधात मी बोलायला तयार आहे, असंही भुजबळ म्हणाले.
सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून आमदारांची घरे पेटवली. ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल पेटवले जात आहेत. याबाबत आपण कुणीतरी कुठंतरी बोललं पाहिजे. एका आवाजमध्ये बोललं पाहिजे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसं मी ओबीसी समाजातील 375 जातींना आवाहन करू शकतो की, आपणही आपलं दु:खं मांडलं पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.