आता ओबीसी समाजासाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती…’; व्हायरल क्लिपवर भुजबळांचं स्पष्टीकरण

  • Written By: Published:
आता ओबीसी समाजासाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती…’; व्हायरल क्लिपवर भुजबळांचं स्पष्टीकरण

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमधील आवाज भुजबळांचा असल्याचे सांगण्यात आले. काल ही ऑडिओ क्लिप राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसी आता काही वाचणार नाही, असं म्हटलं आहे. शिवाय, ते कार्यकर्त्यांना करो या मरोचा सल्ला देत आहेत. दरम्यान, आता यावर भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

इसिसच्या कारवायांमध्ये मदत करणाऱ्या 7 जणांविरुध्द आरोपपत्र, NIA ची मोठी कारवाई 

आज माध्यमांशी बोलतांना भुजबळ यांनी व्हायलर क्लीपविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, सगळीकडे ओबीसी आरक्षणावर आक्रमण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून आमदारांची घरी पेटवली गेली. ओबीसी कार्यकर्त्यांची हॉटेल पेटवल्या जात आहे. या संदर्भात आपण कुणीतरी कुठंतरी बोललं पाहिजे. एका आवाजमध्ये बोललं पाहिजे. असा त्याचा अर्थ आहे. जसं इतर लोक त्यांच्या समाजाला आवाहन करू शकतात, तसं मी ओबीसी समाजातील 375 जातींना आवाहन करू शकतो की, आपणही आपलं दु:खं मांडलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील उपोषणाला बसले असताना 30 तारखेला आंदोलनाने हिंसक रूप धारण केले. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. समता परिषदेचे बीड जिल्हाचे मुख्यपदाधिकारी सुभाष राऊत यांचे सनाराईज हे पंचतारांकित हॉटेल आंदोलकांनी पेटवून दिले. दरम्यान, छगन भुजबळ हे आज बीड दौऱ्यावर आहेत. ते आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष वकील सुभाष राऊत यांची ते भेट घेणार आहेत. तसेच त्या हॉटेलची पाहणी करणार आहेत.

त्याचबरोबर बीड शहरात झालेल्या हिंसाचारात जयदत्त क्षीरसागर यांचंही घर जाळण्यात आलं. त्यांचीही भुजबळ भेट घेणार आहेत. भुजबळ म्हणाले की, सुभाष राऊत माझे समर्थक होते आणि आहेत, जयदत्त अण्णा माझे खास मित्रही आहेत. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले, संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. प्रकाश सोळंके हे देखील राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यांचे घर जाळल्यानंतर त्यांना घरी जाऊन पाहिल तर पाहिजे, त्याासाठी मी बीडला जातोय, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, भुजबळ यांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नाही, अशी भूमिका राहिला आहे. त्यांनी वारंवार मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. जरांगेंना आर्थिक मुदत कुठून येते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, आता त्यांच्या बीड दौऱ्याला मराठा समाज विरोध करणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube