Download App

मलाच का बोलता? सर्वांना बोला, नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल; भुजबळांचं जरागेंना प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अभी भूमिका भुजबळांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेवर जरागेंनी तीव्र संताप व्यक्त केला. भुजबळांनी विचारात बदल करावा, असं जरांगे म्हणाले. यानंतर आता छगन भुजबळांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं

मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली.

या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझा विरोध नाही. मराठा समाजाला निश्चित आरक्षण द्या. ज्यावेळी फडणवीस यांनी यासंदर्भात विधेयक आणले तेव्हा मीही त्याला पाठिंबा दिला. एकढंच आहे की, ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. पाऊणे चारशे जाती आहेत. 17 टक्के आरक्षण शिल्लक आहे, त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्या. त्यासाठी असलेली अडचण दूर करा, असं माझं मत असल्याचं भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले की, हे केवळ माझे मत नाही. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये, हे मुख्यमंत्र्याचं देखील मत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, नाना पटोले, अशोक चव्हाण यांचेही तेच मत आहे. मग मला एकट्यालाच का बोलता? माझ्या एकट्याच्या हातात काय आहे? ही सगळी मंडळी त्याच मताची आहे. हेच मला जरांगेंना सांगायचं आहे. सर्वांचे नेते त्याच मताचे आहेत. या मताच्या विरोधात कोण आहे ते सांगा, असे भुजबळ म्हणाले आहेत. हे सर्वांच्या बाबतीत बोला नाही, तर त्याला राजकारणाचा वास येईल, असंही ते म्हणाले.

जरांगे काय म्हणाले?

काल हिंगोलीत बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने सर्व पक्ष आणि नेत्यांना मोठे केले आहे. मात्र, या समाजाला देण्याची वेळ आली की नकार दिला जातो. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासूची आहे. मात्र, सरकारची आरक्षण देण्याची इच्छाच नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मिळवणारच. भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यांना मोठं करण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मात्र, त्यांनी मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणं चुकीचं आहे. त्यांनी त्यांच्या विचारात बदल केला पाहिजे.

Caste Based Census Report : नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक; जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर 

दरम्यान, राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला आहे. प्रत्येकजण आरक्षणाची मागणी करत असल्याने सरकारचीही कोंडी झाली आहे. मराठा समाजाच्या सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणी ओबीसी समाजाचा विरोध आहे. शिवाय, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा जवळपास संपत आल्यानं आता सरकार हा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us