Ajit Pawar on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी आपण का भाजपसोबत गेलो याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत. त्याबाबत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी पुस्तकात उल्लेख केला आहे. (Chhagan Bhujbal ) त्याचं वृत्त आज लोकसत्तामध्येही छापून आलं आहे. दरम्यान, त्यावर बोलताना अजित पवार यांनी हे मात्र, खोडून काढलं आहे. ते म्हणाले, भुजबळ साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे की मी अशी मुलाखत दिली नाही. हे नवीन नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.
भुजबळ आक्रमक, पुस्तकातील दावे फेटाळत दिला कारवाईचा इशारा; म्हणाले, आठ दिवसांनी..
काय आहे पुस्तकात ?
माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला, असा दावा छगन भुजबळ यांनी केल्याचे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटले गेले आहे. या पुस्तकातील काही उतारे लोकसत्ताने आज बातमीत छापल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच छगन भुजबळ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आता यावर आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले भुजबळ
ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर नेहमीच होत आले आहेत. तसंच, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला क्लीन चीट मिळाली होती. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ५४ लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती. आम्ही फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. त्याचा फायदा विकासासाठी आम्हाला झालेला आहे, अशी प्रतिक्रया छगन भुजबळ यांनी दिली आहे.