Download App

माणिकराव कोकाटे हे उपरे; माझ्या आग्रहामुळे शरद पवारांनी त्यांना…छगन भुजबळांचा कोकाटेंवर वार

महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

  • Written By: Last Updated:

Chhagan Bhujbal on Manikrao Kokate : शरद पवारांना मी बोललो ते घ्यायला तयार नव्हते. परंतू, मी आग्रह केला म्हणून माणिकराव कोकाटेंना पक्षात घेतल. तसं पाहिलं तर ते उपरे आहेत. (Chhagan Bhujbal) कारण, मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. पक्ष स्थापन करताना मी शरद पवारांसोबत होतो असा थेट वार छगन भुजबळ यांनी कोकाटेंवर केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच, तुम्ही काल आलात तुम्हाला काय करायचं आहे? पक्ष आणि मी बघून घेईल असंही भुजबळ म्हणाले आहेत.

कोकाटे काय म्हणाले होते?

महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांची ही नाराजी अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच कृषिमंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी टीका केली आहे. पक्षानं छगन भुजबळ यांचा पुष्कळ लाड पुरवलाय. अजून किती लाड करायचे? असा टोला माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांना लगावला होता. माझे नेते अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. बाकी कोणी नाही, असंही ते म्हणाले होते.

Maharashtra : मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे मंत्रिपद मिळताच कोकाटेंचा भुजबळांना टोला

देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. नायगाव येथील डेव्हलपमेंटबाबत त्यांच्यासोबत चर्चा झाल्याचे भुजबळ म्हणाले. मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा बळी द्यावा अस माझ्या मनात येण शक्य नाही असंही भुजबळ म्हणाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, दोषींवर कारवाई करणार आहेत. त्यामुळं त्याआधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहेत? असंही भुजबळ म्हणाले. जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही असेही ते म्हणाले.

तेलगी प्रकरणात राजीनामा दिला

तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळं माझं उपमुख्यमंत्रीपद गेल्याचे भुजबळ म्हणाले. परंतू, सीबीआय चौकशीत माझ नाव सुद्धा आलं नाही असेही भुजबळ म्हणाले. इथं लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचं उपोषण सोडवायला चार पाच वेळा मुंडे गेले होते ते एकमेकांना ओळखतात असेही भुजबळ म्हणाले.

follow us