Maharashtra : ‘मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे…’; मंत्रिपद मिळताच कोकाटेंचा भुजबळांना टोला

  • Written By: Published:
Maharashtra : ‘मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे…’; मंत्रिपद मिळताच कोकाटेंचा भुजबळांना टोला

Manikrao Kokate on Chhagan Bhujbal: महायुती (Mahayuti) सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)हे नाराज झालेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या भुजबळांनी माध्यमांसमोर आपली नाराजी थेटपणे बोलून दाखवली होती. जहां नही चैना, वहॉं नही रहना, असं सूचक विधान भुजबळांनी केलं. दरम्यान, आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलं.

पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? शंभूराज देसाईंनी डेडलाईनच सांगितली… 

यावेळी राष्ट्रवादीने भुजबळांऐवजी नाशिक जिल्ह्यातून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. काल मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाल्यानंतर कोकाटे यांना कृषी खाते मिळाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोकाट पहिल्यांदाच विधानसभा मतदारसंघात आले होते. यावेळी छगन भुजबळांच्या नाराजीविषयी बोलतांना मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, असं विधान केलं.

Avneet Kaur : अवनीत कौरचा पांढऱ्या ड्रेसमधील हॉट लूक, मादक अंदाज पाहून चाहते घायाळ… 

रविवारी शासकीय विश्रामगृहावर माणिकराव कोकाटे यांचे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. मी खूप आनंदी आहे. कृषिमंत्री ही फार मोठी जबाबदारी आहे. विजेचा प्रश्न, भाववाढ आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर मी काम करेल, असं ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी कोकाटेंना छगन भुजबळांच्या नाराजीबद्दल विचारले. अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला नाही, असं भुजबळ बोलले असल्याचे पत्रकार म्हणाले. त्यावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले, आम्ही याआधी अनेकदा आमदार होतो. मात्र, आम्हाला कधी मंत्रिपद मिळालं नाही. त्यावेळी भुजबळ मंत्री झाले होते. मात्र, आम्ही नाराज झालो नव्हतो. आता भुजबळाना पक्षाने शब्द दिला असेल तर शब्द पूर्ण होईल ना… सरकार स्थापन होऊन आतातरी ४ दिवस झाले आहेत. राज्यसभा कुठे पळून चालली आहे. दम तर काढला पाहिजे ना, असं ते म्हणाले.

भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…
यावेळी पत्रकारांनी कोकाटे यांना विचारले की, भुजबळ यांनी राज्यसभेवर जावे असे तुम्हाला वाटते का? असा सवाल केला असता कोकाटे म्हणाले, त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. मला काय वाटते, याला काही अर्थ नाही. मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, पण मला जे वाटते ते देशात, जगात होईलच असं नाही.

दरम्यान, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाला 10 मंत्रीपदे मिळाली आहेत. त्यात राष्ट्रवादीने छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मरावबाबा आत्राम या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली नाही. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक यांना मंत्रीपदे दिली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube