छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा बंद पडल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (School) येथे कमी विद्यार्थी संख्येचे कारण देऊन महापालिकेने २०२३ ते २०२५ या दोन वर्षांत मराठी आणि उर्दू माध्यमाच्या वीस शाळांना टाळे लावले. या शाळांचे इतर शाळांत विलिनीकरण करण्यात आलं आहे.
महापालिकेच्या सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमध्ये ‘प्रवेश फुल्ल’ होत असताना मराठी आणि उर्दू शाळा मात्र कमी विद्यार्थी संख्ये कारण देऊन बंद केल्या जात आहेत. त्यांचे अन्य शाळांमध्ये विलिनीकरण केले जात आहे. नव्या शाळा लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला मुकावं लागत आहे. सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षांत विद्यार्थी संख्येचे कारण पुढं करून पालिकेने वीस शाळा बंद केल्या. एके काळी पालिकेच्या शाळांची संख्या ८२ होती. ती आता ५० झाली आहे.
मराठी आणि उर्दू माध्यमांच्या वीस शाळा बंद केल्या आहेत. या शाळांचे इतर शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे. एकेकाळी ८२ असलेल्या पालिका शाळांची संख्या आता ५० झाली आहे. सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश फुल्ल होत असताना या शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावं लागत आहे. हा निर्णय २०२३ ते २०२५ या काळात घेण्यात आला आहे.
बंद करण्यात आलेल्या शाळा
२५ ऑगस्ट २०२३च्या आदेशानुसार
प्राथमिक शाळा, नागेश्वरवाडी
प्राथमिक शाळा, किराडपुरा क्र. – ३ मराठी
प्राथमिक शाळा, सिडको एन ९
प्राथमिक शाळा, विठ्ठलनगर
प्राथमिक शाळा, भारतनगर क्र. २
प्राथमिक शाळा, जवाहर कॉलनी
प्राथमिक शाळा, देवळाई म्हाडा
प्राथमिक शाळा, शहानुरवाडी
प्राथमिक शाळा, रोहिदासपुरा
प्राथमिक शाळा, खोकडपुरा
प्राथमिक शाळा, प्रियदर्शिनी इंदिरानगर (उर्दू)
प्राथमिक शाळा, चिकलठाणा (उर्दू)
केंद्रीय प्राथमिक शाळा, एन १२
८ सप्टेबर २०२३च्या आदेशानुसार
प्राथमिक शाळा विष्णुनगर
१२ ऑक्टोबर २०२३च्या आदेशानुसार
प्राथमिक शाळा, सिल्लेखाना (उर्दू)
प्राथमिक शाळा, जिन्सी/रेंगटीपुरा (उर्दू)
प्राथमिक शाळा, शहासोक्ता कॉलनी (उर्दू)
२० फेब्रुवारी २०२५च्या आदेशानुसार
प्राथमिक शाळा, हनुमाननगर
प्राथमिक शाळा, भारतनगर क्र. १
प्राथमिक शाळा, शताब्दीनगर
