Download App

भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी पण कोशात.. सत्कारपर भाषणात काय म्हणाले मुख्यमंत्री?

भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला.

CM Fadnavis on Chief Justice Bhushan Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गवई यांचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून आहे. (Gavai) गवई यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी फक्त सत्कार नको तर संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा अशी मागणी केली होती असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला. त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला. मुंबई उच्च न्यायालयात असताना अनेकदा कायदा आणि व्यापक जनहित असताना ही त्यांनी मार्ग काढला होता अशी आठवणही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितली. तसंच, वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती. मात्र, गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला असंही फडणवीस म्हणाले.

निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड सरकारी बंगला सोडेनाच; सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

हायकोर्टात असताना ही ते वकिलांच्या बाजूने असायचे. आज ही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना 3/4 मतदान होईल. एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात. असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे म्हणाले यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले, पण आजच्या सत्काराची विधिमंडळामध्ये नोंद होणार आहे. आजच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती. लोकशाहीला अधिक बळकट करणारी अशी व्यवस्था आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठी जबाबदारी ही सरन्यायाधीश यांची असते. ही जबाबदारी आता भूषण गवई सांभाळत आहेत असं अजित पवार म्हणाले.

follow us