राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार?…,मुख्यमंत्री फडणवीस अन् अमित शाहांची बंद दाराआड खलबत

समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यामध्ये राज्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली आहे.

News Photo   2026 05 27T193234.137

राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार?...,मुख्यमंत्री फडणवीस अन् अमित शाहांची बंद दाराआड खलबत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. (Devendra Fadanvis) यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, अजूनही विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या सर्व पार्शाभूमीवर ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यामध्ये राज्यातील विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली आहे. विधान परिषदेच्या जागा वाटपाचा महायुतीमधील तिढा अजूनही कायम आहे. याबाबत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची नेमकी मागणी काय आहे, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच महायुतीमधील अंतर्गत वादातील मुद्यांवर देखील यावेळी चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.

 

Exit mobile version