संविधान धोक्यात असल्याच्या चर्चा पण कधीही गदा येणार नाही; साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन सातारा येथे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते पडले पार.

Untitled Design (193)

Untitled Design (193)

CM Fadnavis said that the aim is to bring public recognition to Marathi : 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औपचारिक उद्घाटन आज सातारा येथे ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. मृदुला गर्ग(Dr. Mrudula Garg) यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी ‘दलित साहित्य हे मराठी साहित्यविश्वाचा आत्मा आहे’ अशी ठाम भूमिका मांडली. या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील(Vishwas Patil) यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर(Tara Bhavalkar) यांच्याकडून स्वीकारली. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. हजारो पुस्तकांनी सजलेली ही ग्रंथनगरी वाचकांसाठी ज्ञानाचा खजिना ठरत असून साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या अनेक कट्ट्यांचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘आपण सर्वजण साहित्याचे सेवेकरी आहोत. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही सेवा अखंडपणे सुरू राहिली पाहिजे.’ सातारा हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून तो विचारांचा आणि संस्कृतींचा संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. साहित्याचा असा अनोखा संगम म्हणजेच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे, असेही ते म्हणाले.

ZP Election 2026 : लवकरच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा, ‘या’ दिवशी होणार मतदान ?

जगभरातील संस्कृतींमधील चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपण आपली संस्कृती अधिक समृद्ध केली आहे. साहित्य आणि संस्कृतीमुळे आपले विचार अधिक प्रगल्भ होतात, असे त्यांनी सांगितले. साताऱ्याने आतापर्यंत सर्वाधिक सहा मराठी साहित्य संमेलने घडवली असून सर्वाधिक अध्यक्षही या भूमीने दिले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावेळी दुर्गाबाई भागवत यांच्या आठवणींना उजाळा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आशय आणि विषय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत,’ असे दुर्गाबाई भागवत यांनी याच साताऱ्यातील साहित्य संमेलनात सांगितले होते. आणीबाणीच्या काळात साताऱ्यातील साहित्य संमेलनात आणीबाणीविरोधी ठराव मांडण्यात आला होता, या इतिहासाची देखील त्यांनी आठवण करून दिली.

‘साहित्याला नियमबद्ध करणे हे केवळ हास्यास्पदच नाही तर धोकादायक आहे,’ असे दुर्गाबाई भागवत यांचे विधान उद्धृत करत मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि परस्परविरोधी विचार मांडण्याचे स्वातंत्र्य कायम अबाधित राहील. संविधान धोक्यात असल्याच्या कितीही चर्चा झाल्या तरी त्यावर कधीही गदा येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता संपूर्ण भारतभर मराठीला लोकमान्यता मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीतील जेएनयूमध्ये मराठी अध्ययन केंद्र सुरू करण्याची संधी मिळाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राज ठाकरेंची भाषणं असतात भारी, पण कामाच्या नावाने पाटी कोरी; नाराजी दूर होताच रामदास आठवलेंची फटकेबाजी

महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्रिसूत्री भाषाविषयक धोरणावर भाष्य करताना कोणत्या वर्गापासून ही अंमलबजावणी करायची, यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशी भाषांना प्राधान्य देताना भारतीय भाषांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही, असे मत त्यांनी मांडले. मातृभाषा अबाधित ठेवतानाच देशातील इतर भाषांचाही सन्मान राखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.

वारकरी साहित्य आणि विचारांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली असून मराठी म्हणून आपण एकजूट आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. समाजात मतभेद असले तरी संतांनी नेहमीच एकत्र आणण्याचे काम केले. साहित्याची निर्मिती केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला नवी दिशा देण्यासाठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘साहित्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी आपले मनोगत संपवले.

Exit mobile version