Chief Minister Eknath Shinde on Ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे अयोध्या दौऱ्यावरून (Ayodhya tour) असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यानी शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. ही आरती झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते जनतेशी नेमकं काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले. दौऱ्याचे आयोजन करणाऱ्यांचे त्यांनी विशेष आभार मानले.
आज अयोध्या दौऱ्या निमित्त हजारो शिवसैनिक अयोध्येमध्ये उपस्थित होते. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यानंतर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, तुम्ही सगळ पाहाता आहात. प्रभू रामचंद्राची ही अयोध्या यात्रा कालपासून सुरू झाली आणि त्याच समारोप होतो आहे. सकाळी रामल्लाचं दर्शन घेतलं. आरती केला. भव्य दिव्य राममंदिरा निर्माणाचं काम पाहिलं. नंतर हनुमान गढील दर्शन घेतलं. त्यानंतर लक्ष्मण किल्यामध्ये दर्शन घेतलं. लखनऊपासून अयोध्येपर्यंत वातावरण निर्मिती केल्याचे त्यांनी सांगिलते. अयोध्या दौरा यशस्वी झाल्याते ते म्हणाले. तसेच युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आण दौरा आयोजित करण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाचे आभार मानले.
अयोध्येतील वातावरण पाहून विरोधकांना झोप येणार नाही; श्रीकांत शिंदेचा हल्लाबोल
मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिले होते. ते आता खरं ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी आभारी आहे. लोकांच्या भावना ओळखून त्यांनी राम मंदिराचा विषय मार्गी लावला. आजचा दिवस हा आमच्यासाठी महत्वाचा आहे. सर्व महंतांनी मला आशिर्वाद दिला. अयोध्या नगरीचे प्रमुख गोपाळदास महाराज हे तब्येत बरी नसतांनाही मला आशिर्वाद देण्यासाठी आले. त्यांचा मी आभारी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. राम मंदिर आणि अयोध्या हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. विकासांची काम याठिकाणी होत आहेत. त्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मंदिराचे अतिशय वेगानं काम सुरू आहे, मोदींच्या नेतृत्वात पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिरामध्ये मूर्तीची स्थापना होईल, असं ते म्हणाले.
अयोध्या यात्रेचा समारोप झाला अशी घोषणा करताना त्यांनी पोलीस, मीडीया, यांच्यासह उपस्थितांचे आभार मानले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे योगी आदित्यनाथ यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
महाआरतीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलतांना ते म्हणाले की, आमच्यावर अनेकांनी रावणराज अशी टीका केली. पण मी विचारतो की, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण केले. तेव्हा त्यांना देशद्रोहाच्या कायद्याखाली तरुंगात टाकण्याचे पाप केले. ज्यांनी हे काम केलं ते सरकार रावणराज्य आहे की रामराज्य आहे? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांचं स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन केलं. ज्यांचे दाऊतसोबत संबंध आहे. त्यांच्यासोबत आम्ही फारकत घेतली आणि वेगळं सरकार स्थापन केलं, असा घणाघात त्यांनी केला.