Download App

उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा त्याच मैदानात…

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे. यातच दोन्ही गट एकमेकांवर निशाणा साधण्याची संधी सोडत नाही. यातच काही दिवसांपूर्वी खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. आता याच खेडमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सभा घेणार आहे. दरम्यान शिंदे सभा घेणार आहे म्हणजे आज पुन्हा एकदा ते ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधणार अशा चर्चा रंगू लागल्या आहे. शिंदे आज काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दोन गट निर्माण झाले. एक शिंदे गट व दुसरा ठकरे गट. या दोन्ही गटात शीतयुद्ध हे सुरूच असते. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी देखील एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. यातच ठाकरे यांनी खेडमध्ये काही दिवसांपूर्वी घेतलेल्या सभेमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी शिंदे गटाचा देखील समाचार घेतला होता. त्यामुळे आता शिंदे गटाकडून देखील याला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आज वर्तवली जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच गोळीबार मैदानात आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा घेणार आहे. विशेष म्हणजे एकेकाळी ठाकरेंचे जवळचे सहकारी मानले जाणारे मात्र आता शिंदे गटात असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत.

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, तीसहून अधिकजण…

या सभेमध्ये शिंदे आज काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनवर निशाणा साधणार का? तसेच अन्य राजकीय परिस्थितीवर ते काय बोलतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिंदेंच्या सभेवर ठाकरे गटाने साधला निशाणा
एकनाथ शिंदे आज सभा घेणार यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टीका केली आहे.
लोकशाहीमध्ये कोणीही, कुठेही सभा घेऊ शकतो. पण म्हणून प्रत्येक सभेला उत्तर दिले जात नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी सभा घेतल्यानंतर आता या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घेणे हा पोरकटपणा आहे, असं आमदार जाधव म्हणाले.

Tags

follow us