मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, तीसहून अधिकजण…

Untitled Design   2023 03 19T073335.574

मुंबई : मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने जाणार्‍या एका खासगी बसला (Private Bus) बावधन (Bavadhan) येथील रस्त्यावर अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 5 प्रवाशी जखमी (Passengers Injured) झाले असुन बसमध्ये एकुण ३६ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, बावधन येथील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मुंबईकडून बेंगलोरच्या दिशेने परी शर्मा ट्रॅव्हल KA ५१ AC १४४७ या क्रमांकाच्या खासगी बसने एकूण 36 प्रवासी हे प्रवास करत होते. मात्र रात्री अचानक सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटले.

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियाचा दुसरा एकदिवसीय सामना रविवारी, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहायचा हा सामना

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सादर खासगी बस सर्व्हिस रोडवर पलटी झाली. या घटनेमध्ये पाच प्रवाशी जखमी झाले आहे. त्या सर्वांना तत्काळ जवळच असलेल्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार सुरु आहे.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, रशिया आक्रमक

तसेच रस्त्यावर झालेल्या या अपघाताच्या घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामुळे घटनास्थळी तात्काळ पोलीस पथक दाखल झाले. बचावपथकाने सर्व्हिस रोड वरील बस बाजूला करण्याच काम केलं आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे. सुदैवाने अपघात कोणतीही जीवीतहानी नाही.

follow us