Chitra Wagh : राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. असा टोला चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी कोल्हापूर (KOlhapur) आणि अहमदनगरमधील (Ahmednagar) तणावपूर्ण परिस्थितीवर लगावला. काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्या प्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं. हे सगळं ठरवून केलं जातंय, हे जनताही पाहतेय. (Chitra Wagh Criticize on Mahavikas Aghadi and Sanjay Raut, Jitendra Awhad)
यावेळी चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राधंट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हटल्याकी या दोघांनी खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा. खरंच ते हिंदू आहेत का याची त्यांना देखील खात्री होईल.
तसेच यावेळी चित्रा वाघ यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल.
Chitra Wagh : राज्यात औरंग्याची पैदास वाढू लागली, महाविकास आघाडीने आपला डीएनए टेस्ट करावा pic.twitter.com/zucjl5LvCZ
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 8, 2023
चित्रा वाघ म्हणाल्या…
राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागलीय… ती ज्यांनी जन्माला घातलीय, त्या महाविकास आघाडीच्या पैदावारांचा डीएनए आणि औरंगजेबाचा डीएन एकच असावा. सर्वज्ञानी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा.
काय आहे प्रकरण…
दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यामुळे सर्व राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते.