Uddhav Thackeray : …. तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते, उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात

Uddhav Thackeray : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात हजारो विद्यार्थी कॉक्रोच जनता पार्टीसह आंदोलन करत आहे. या आंदोलनाला आता विरोधक देखील समर्थन करत असल्याने मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, मी काल केवळ अभिजित दिपके (Abhijit Dipke) आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची भेट घेण्यासाठी गेलो होते. या आंदोलनाला माझा पाठिंबा कालपासून नाही तर पहिल्या दिवसापासून आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांशी सुरुवातीलाच चर्चा केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. कोणतेही आंदोलन झाल्यास सरकारने संबंधितांशी संवाद साधणे, त्यांच्या मागण्या ऐकून घेणे आणि गैरसमज दूर करणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जर अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्याशी पहिल्याच दिवशी चर्चा झाली असती तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.

शेअर मार्केट घोटाळा, आर्थिक तडजोड पोलीस निरीक्षकाला भोवली; गुन्हे शाखेतील राठोड निलंबित-

लोकांवर आपले मत जबरदस्तीने लादणे लोकशाही नसून हुकूमशाही

पुढे माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल करत लोकांवर आपले मत जबरदस्तीने लादणे आणि त्यांचे म्हणणे न ऐकणे ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याची टीका देखील माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली.

‘मन की बात’ ऐकवण्यापेक्षा ‘जन की बात’ ऐका

केंद्र सरकारवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. जनता ही हवा उतरवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांशी वेळेत चर्चा केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत ठाकरे म्हणाले, फक्त स्वतःची ‘मन की बात’ लोकांना बळजबरीने ऐकवण्यापेक्षा ‘जन की बात’ ऐकून घेतली पाहिजे.

“पाकिस्तानशी चर्चा करता, पण विद्यार्थ्यांशी नाही”

सरकारच्या धोरणांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास तयार आहे; पण स्वतःच्या विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार नाही. उलट त्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. ही लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे.

Exit mobile version