Clashes Between Two Groups at Shirsala near Parli : बीड जिल्हयातील परळी जवळील शिरसाळा येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक बुलेट गाडी देखील पेटवण्यात आली आहे. (Shirsala ) या प्र
करणात परस्परविरोधी शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
परळी तालुक्यातील शिरसाळा येथे आठवडी बाजारात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेतील एका गटाने बुलेट पेटवली आहे. विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉपचे चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे, अशी धमकी दिली होती. यानंतर वाद घातल्यानंतर दोन गट आपापसात भिडले होते.
यादरम्यान बाजूलाच उभी असलेली बुलेट पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शास्त्र प्रमाणे रद्द निलंबित करण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर अवैध शस्त्र परवानाचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे
जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेताच, ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा 232 जणांची यादी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे पाठवली. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आणि शस्त्रपरवाण्याचा मुद्दा चर्चेत आला
जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत आतापर्यंत 310 शस्त्र प्रमाणे रद्द केले आहेत. तर 127 जणांवर कारवाई केलीय. यात आणखी प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी आणखी 5 प्रस्ताव पाठवले असून 19 जणांच्या अर्जावर मात्र आक्षेप नोंदवला आहे.