‘माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर नामदेवशास्त्री जबाबदार’, बीड पोलिसांत कोणी केली तक्रार दाखल?
![‘माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर नामदेवशास्त्री जबाबदार’, बीड पोलिसांत कोणी केली तक्रार दाखल? ‘माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर नामदेवशास्त्री जबाबदार’, बीड पोलिसांत कोणी केली तक्रार दाखल?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Namdev-Shastri_V_jpg--1280x720-4g.webp)
Namdev Shastri : भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्रींनी (Namdev Shastri) संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना क्लीनचिट दिली होती. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. दरम्यान, आता बीडमधील भागचंद महाराज झांजे (Bhagchand Maharaj Zanje) यांनी नामदेवशास्त्रींविरोधात एक तक्रार दाखल केली.
माझ्या जीवाचे काही बरं-वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर बीडचे भागचंद महाराज झांजे यांनी माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेनंतर, भागचंद महाराज झांजे यांनी महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या अनुयायांकडून आपल्याला वारंवार धमक्या मिळत आहेत, असा दावा केला होता. ते म्हणाले, मी प्रतिक्रिया दिल्यानंतर, मला महाराष्ट्रातून महंत नामदेवशास्त्री महाराजांच्या अनुयायांचे फोन येऊ लागले. तुझी लायकी आहे का, तुझी कुवत आहे का, तुला घेरतो, मारतो, अशा धमक्या देण्यात आल्या. मला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. तू महाराष्ट्रात कुठेही जा, तुला मारूनच टाकणार, अशी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, आजही धमकीचे कॉल आले, असं ते भागचंद महाराज म्हणाले.
सांगली हादरली! चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजाऱ्याचे अमानुष कृत्य
दरम्यान, या फोन कॉलवरील धमक्यानंतर भागचंद महाराज यांनी बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. नामदेव शास्त्री महाराजांचे अनुयायी गेल्या पाच दिवसांपासून आपल्याला फोनवरून धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू, जिवे मारू, ठोकून काढू, असे फोन कॉल करत आहेत. त्यामुळं माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशी तक्रार भागचंद महाराजांनी केली.
दरम्यान, भागचंद महाराज झांजे यांनी तक्रार नोंदवल्यानंतर आता बीड पोलीस धमक्या देणाऱ्यांवर काय कारवाई करणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.