सांगली हादरली! चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजाऱ्याचे अमानुष कृत्य
![सांगली हादरली! चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजाऱ्याचे अमानुष कृत्य सांगली हादरली! चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, शेजाऱ्याचे अमानुष कृत्य](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/sangali-news_V_jpg--1280x720-4g.webp)
सांगली : राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबतांना दिसत नाही. आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात (Jat) एका ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, आरोपीने मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह घरातील पेटीमध्ये लपवून ठेवला होता. या प्रकरणी, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पांडुरंग सोमनिंग कळळी-पुजारी (Pandurang Somaning Kalli-Pujari) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रूपाली चाकणकर नेत्यांना पाठिशी घालण्यासाठी महिला आयोगात; प्रश्न विचारताच करूणा शर्मा भडकल्या
जत तालुक्यातील करजगे गावात ४ वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून बलात्कार करून झाल्याचा दाट संशय असून पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच ते स्पष्ट होणार असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली.
या प्रकरणी पोलिसांनी पांडुरंग सोमनिंग कळळी-पुजारी याला अटक केली आहे. संशयित आरोपी पांडुरंग कळळी-पुजारी हा मुलीच्या घराशेजारीच राहायला आहे. गुरुवारी सकाळपासून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला होता. मात्र, मात्र, तिचा काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे मुलगी बेपत्ता झाल्यानंतर गावात दवंडी पिटवून मुलीचा शोध सुरू करण्यात आला होता. तसेच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देखील होती.
अजित पवार महायुतीत आले नसते तर आमचेही 100 आमदार…; गुलाबराव पाटलांचे मोठं विधान
मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच, पोलीसही गावात पोहोचले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला तेव्हा त्यांना पांडुरंग कळळी-पुजारी हा संशयितरित्या फिरत असल्याचं दिसून आलं. त्यांच्यावर संशय बळवल्याने त्याच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा घरातील एका पत्राच्या पेटीत संबंधित मुलगी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी पांडुरंग कळळी-पुजारी याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.