अजित पवार महायुतीत आले नसते तर आमचेही 100 आमदार…; गुलाबराव पाटलांचे मोठं विधान

  • Written By: Published:
अजित पवार महायुतीत आले नसते तर आमचेही 100 आमदार…; गुलाबराव पाटलांचे मोठं विधान

Gulabrao Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटी (Gulabrao Patil) यांनी आज नांदेडमधील एका कार्यक्रमात महायुतीबाबत (Mahayuti) मोठं विधान केलं. उपमुख्यमंत्री अजित पवा (Ajit Pawar) महायुतीत आले नसते तर आमचेही १०० आमदार निवडून आले असते, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. तसंच अजित पवारांची एन्ट्री मागून झाली, असंही ते म्हणाले. विशेष म्हणजे, गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समोरच हे विधान केलं.

कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण ​ 

विधानसभा निवडणुकीत भाजपने १४८ जागा लढवल्या होत्या. तर शिवसेनेने ८५ जागा लढवल्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने ५४ जागा लढवल्या होत्या. महायुतीने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली होती. शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटाने महायुतील साथ दिली होती. या निवडणुकीत अजित पवार गटाने ४१ जागा तर शिंदे गटाने ५७ जागांवर विजय प्राप्त केला होता. दरम्यान, आज एका कार्यक्रमात बोलतांना गुलाबवार पाटील म्हणाले की, अजित पवार महायुतीत आले नसते तर आमचेही १०० आमदार झाले असते. त्यांची मागून एन्ट्री झाली म्हणून प्रोब्लेम झाला. शेवटी वरची अॅडजस्टमेंट आहे. आमच्या साहेबांनी दाढीवर हात फरिवला तर काम होऊन जाईल. आम्ही ८० जागांवर निवडणूक लढवली आणि आमचे ६० आमदार निवडून आले, असं ते म्हणाले.

कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण ​ 

यावेळी बोलतांना गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. एकनाथ शिंदेंमुळे नांदेडचा इतिहास बदलला आहे.आमदार हेमंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या जिल्ह्यात शिवसेनेचा विस्तार करण्याचे काम केलं. मोठ्या कष्टाने वाढवलेली बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचे विचार काही लोकांनी कॉंग्रेसच्या दावणीला बांधले, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी ठाकरेंवर टीका केली.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, भगवा आणि शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचं काम केलं. त्यासाठीच आम्ही सुरतमार्गे गुवाहाटीला गेलो. पण आमच्या या निर्णयावर गद्दार म्हणून टीका केली जाते. शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी काही सडलेले अंडे बोलतात. पण, शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं, असं गुलाबराव पाटील यांनी केलं.

दरम्यान, गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube