कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण ​

कोर्टाने पत्नी म्हटलच नाही, करूणा शर्मांना पोटगीचा विषय नाही; मुंडेंच्या वकिलांचे स्पष्टीकरण ​

Advocate on Dhananjay Munde Karuna Karuna Sharma dispute : कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (Family Court in Bandra मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) करूणा शर्मांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र यावर मुंडेंचे वकील शार्दुल सिंग यांनी सांगितले की, कोर्टाने दिलेल्या आदेशामध्ये कुठेही करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या बायको असल्याचे म्हटलेच नाही. त्यामुळे त्यांना पोटगी देण्याचा विषय येत नाही.

दिल्लीत कोण मारणार बाजी? Axis My India ने दिला धक्कादायक एक्झिट पोल

2022 मध्ये करुणा शर्मा यांनी आपल्याला पोटगी मिळावी म्हणून केस दाखल केली होती. त्यानुसार या केसवर कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. तसेच त्यांच्यासोबतचे कोणतेही लिव्ह इन रिलेशन शिप असल्याचे धनंजय मुंडे यांनी नाकारलेले नाही. त्यामुळे मासिक एक लाख अशी पोटगी त्यांना देण्याचा आदेश आहे.

माझ्या मुलावर पोस्ट करण्यासाठी धनंजय मुंडेंचा दबाव, करुणा शर्मांचे गंभीर आरोप

मात्र त्यामध्ये कोठेही करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर त्यांच्या कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक घरगुती हिंसाचार झाला आहे असे देखील कोर्टाने म्हटलेलं नाही. त्यामुळे मुंडे यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की, जर त्या पत्नी नसतील तर त्यांना पोटगी देण्याचा विषय येत नाही. दुसरीकडे करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केलेले आरोप कोर्टाने अंशतः मान्य केले. तसेच धनंजय मुंडेंना करूणा यांना दर महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र, वांद्र कोर्टाने पोटगीबाबत दिलेला निकाल करुणा शर्मांना मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात (Mumbai High Court) दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube