दिल्लीत कोण मारणार बाजी? Axis My India ने दिला धक्कादायक एक्झिट पोल

  • Written By: Published:
दिल्लीत कोण मारणार बाजी? Axis My India ने दिला धक्कादायक एक्झिट पोल

 Axis My India Exit Poll : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झाल्यानंतर आता दिल्लीमध्ये (Delhi Elections Results) कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच आता प्रदीप गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील Axis My India ने एक्झिट पोल दिला आहे. या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसताना दिसून येत आहे. अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीमध्ये भाजप (BJP) सत्तेत येताना दिसत आहे. अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 70 पैकी 45-55 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर आपला 15-25  जागा मिळतील तर काँग्रेसला (Congress) जास्तीत जास्त एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दिल्लीतील जनतेची पहिली पसंती आहेत त्यानंतर भाजपचे परवेश वर्मा आणि मनोज तिवारी यांचा क्रमांक लागतो. असं अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे.

तर अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील 10 जागांपैकी भाजपला सात जागा मिळण्याची शक्यता आहे, तर आपला तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे. अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपला 10 पैकी सहा जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर आपला चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजप आणि आपला प्रत्येकी पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातील 10 जागांपैकी भाजपला दोन आणि आम आदमी पक्षाला तीन जागा मिळू शकतात. पश्चिम दिल्लीतील 10 जागांपैकी भाजपला 8 जागा मिळू शकतात तर आम आदमी पक्षाला 2 जागा मिळू शकतात. पूर्व दिल्लीत भाजप जोरदार कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपला 8 जागा मिळू शकतात तर आम आदमी पक्षाला 2 जागा मिळू शकतात.

सर्वसामान्यांना मिळणार दिलासा, RBI घेणार मोठा निर्णय, 5 वर्षात पहिल्यांदाच कमी होणार EMI ?

उत्तर पश्चिम दिल्लीतील 10 जागांपैकी भाजपला 9 जागा मिळू शकतात आणि आम आदमी पक्षाला एक जागा मिळू शकते. जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर 48 टक्के भाजपच्या बाजूने आहेत तर आम आदमी पक्षाला 42 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला तीन टक्के मते मिळत असल्याचा अंदाज अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube