लॅंडिंग आधी अजितदादांनी केला होता फोन; अखेरच्या कॉलमध्ये काटेवाडीच्या पवारांना काय म्हणाले?

Ajit Pawar यांनी विमान लॅंड होण्या अगोदर काही मिनिटं अगोदर केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. अजित पवारांचा हा अखेरचा फोन कॉल ठरला आहे.

Ajit Pawar

Ajit Pawar

Clip of Ajit Pawar’s last phone call from a plane to Vishvjeet Pawar in Katewadi : 28 जानेवारीच्या सकाळी राज्यावर एक दु:खद आणि दुर्दैवी बातमी समोर आली होती. ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीसह राष्ट्रीय नेत्यांकडून केली आहे. त्यानंतर आता अजित पवारांनी विमान लॅंड होण्या अगोदर काही मिनिटं अगोदर केलेल्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. अजित पवारांचा हा अखेरचा फोन कॉल ठरला आहे.

कुणाला केला अजितदादांनी अखेरचा कॉल?

बुधवारी, 28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला येत असताना सकाळी पावनेनऊ च्या सुमारास अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्या अगोदर काही मिनिटं म्हणजे 8 वाजून 37 मिनिटांनी केलेला केलेल्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. अजित पवारांनी हा फोन कॉल काटेवाडी येथे केला होता. त्यांचे पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी दादांनी विमानातून अखेरचा मोबाईल संवाद साधला होता. शेवटच्या क्षणापर्यंत सर्व जातीतील समाज घटकाला सोबत घेऊन जाण्याची दादांची भूमिका अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जपली हे या संवादातून स्पष्ट होते.

फोनवर नेमकं काय म्हणाले अजित पवार?

हा फोन जिल्हा परिषदेच्या उमेदवारीबाबत होता. तसा मॅसेज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी अजितदादांना केला होता. मात्र नेटवर्कमुळे काही वेळाने अजितदादांकडून श्रीजीत यांना परत फोन आला. त्यावेळी ते म्हणाले की, अरे बाबा दिगंबर दुर्गाडे माळी समाजाचा माणूस गेली अनेक वर्ष मी अख्या जिल्हा बॅंकेचा चेअरमन केला. ही बॅंक तर एवढीशी आहे. तुम्हाला माहिती नसत काही नसत. आम्ही पण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. तुमचं मान्य आहे. पण मी आता सुपा गटातून माळी समाजाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. तिथे ओबीसीचं आरक्षण होतं. इतर पक्षांनी दुसरेच उमेदवार दिले आहेत.

मोठा अनर्थ टळला! मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या विमानांच्या पंखांची धडक, नेमकं काय घडलं?

दरम्यान या फोन कॉलची ऑडिओ क्लिप जाहीर करत श्रीजीत पवारांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मी त्यांनी मेसेज केला होती. नेटवर्कमध्ये आल्यानंतर लगेच त्यांना तो मेसेज मिळाला आणि त्यांनी मला लॅंडिंगच्या वेळी देखील माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ते एवढं महत्त्व देत होते.

Exit mobile version