डीजे विरूद्ध आवाज उठवणाऱ्या बापटांवर हल्ला; फडणवीस म्हणाले, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार मात्र…

CM Devendra Fadanvis यांनी विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आली गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली प्रतिक्रिया दिली आहे.

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis

CM Devendra Fadanvis on Attack on Vidyanand Bapat, who raised his voice against DJs in Pune : गणेश उत्सवात डीजे वादान विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात मारहाण करण्यात आली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असताना बापट यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. विद्यानंद बापट हे सातत्याने dj विरोधी भूमिका घेत आहेत.गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या टिळक रडत्यावर dj चा दणदणाट असतो त्याच टिळक रस्त्यावर त्यांना मारहाण झाली आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

अशा प्रकारे मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांच्यावर मत मांडत असताना असा हल्ला करणे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. त्यामुळे एकमेकांना समजून घेऊन आपला गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्या दुष्टीने काय करता येईल त्या सर्व गोष्टी केल्याा पाहिजेत. कदाचित पहिल्या वर्षी 100 टक्के होणार नाही. पण 100 टक्के प्रयत्न केला पाहिजे.

विद्यानंद बापट काय म्हणाले?

मी प्रतिक्रिया देत होतो तितक्यात एक वेडा आहे आणि माझ्यावर हल्ला केला कारण मी निशस्र होतो. त्याला फक्त सवंग प्रसिद्धी हवी होती मी जस म्हणतो घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् अगदी तसंच. आता पोलिसांकडे सगळे फुटेज त्यात पाहून पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं आणि तुडवून काढावं म्हणजे त्याला कळेल मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने द्यायचं असत गुद्याने नाही. अशी प्रतिक्रिया या मारहाणीनंतर बापट यांनी दिली आहे.

Exit mobile version