CM Devendra Fadanvis Reaction On Manoj Jarange Statement : विधानसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर जोर दिलाय. नव्या सरकारला त्यांनी पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) जरांगेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा मजा घेण्याचे प्रश्न नाही. हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात मी पहिल्या दिवसापासून असेन. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील (Maratha Reservation) असतील. आमच्या भूमिकेमध्ये कोणतेच अंतर नाही, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्याचप्रमाणे आमच्यात कोणताही अंतरविरोध देखील नाहीये. आतापर्यंतचे निर्णय तिघांनी मिळून घेतलेले असून देखील पुढे देखील तिघे मिळून निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीसांनी असं उत्तर जरांगेंच्या प्रश्नावर दिलंय.
शिंदेंच्या शिलेदाराचे गृहखात्यावर गंभीर आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच धाडलं पत्र
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून मनोज जरांगे आता पुन्हा एकदा सरकारला (Devendra Fadanvis) घेरताना दिसत आहे. मनोज जरांगे परभणी जिल्ह्यातील दामपुरी गावामध्ये मुक्कामी होते. तेथील गावकऱ्यांशी जरांगेंनी संवाद साधला. त्यांनी तेथे देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. तसंच मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचं देखील जरांगेंनी सांगितलं. त्यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) विषय संपल्यानंतर शेतमालाचा भाव, धनगर-मुस्लीम आरक्षण कसं देत नाही, हे बघतो. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर सरकारला भयंकर आंदोलन बघावं लागेल, असा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. राज्यभरातील मराठ्यांनी 25 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीत याचचं. त्या दिवशी कोणीही लग्नाची तारीख काढू नका, असं आवाहन देखील जरांगेंनी राज्यभरातील मराठा बांधवांना केलाय.