शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची जवळीक वाढली आहे. (BJP) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू या निवडणुकांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या राजकीय युतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे याच्यावर महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांचे काही प्रेम नाही, त्यांचा हे वापर करतात असं मत फडणवीस यांनी मांडलं आहे.
त्याचबरोबर आमचे संबंध आहेत. मैत्री आहे, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात. मी देखील कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो. आता त्यांना ज्या ठिकाणीत्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तेथे ते जातील असंही फडणवीस म्हणाले. आता त्यांना कदाचित असं वाटत असेल की, आमच्याकडे जागा नाही. आम्ही तीन पक्ष आहोत.
उपमुख्यमंत्री नेमायचे, पण विरोधी पक्षनेता नाही; जाधवांनी खास शैलीत सरकारला घेरलं
जवळपास महाराष्ट्रातील पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे आमच्याकडे पाहून तरी कोणाला खूप काही स्कोप आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असेल की इकडं स्कोप नाही, तिकडे जावं. तर ते तिकडे गेलं असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. तसंच, राज ठाकरेंचा राजकारणात उपयोग केला जात असल्याचंही ते म्हणाले.
राज ठाकरे यांना कधीतरी याचं चिंतन करावंच लागेल की, महाविकास आघाडी असंल, आता उद्धव ठाकरे असतील या कोणाचेही त्यांच्यावर प्रेम नाहीये. त्या-त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून, दुसर्यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात. आता राज ठाकरेंना निर्णय करायचा आहे की त्यांना कोणाबरोबर राहायचं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
