Download App

हिंदी भाषा सक्ती, संभाजी ब्रिगेड ते विधान भवनातील हाणामारी; मुख्यमंत्र्यांची सभागृहात सविस्तर उत्तरं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अनेक घटनांची सविस्तर उत्तर दिली.

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis Is Assembly Hall : गुरुवारी विधानसभेच्या लॉबीमध्ये (Assembly) जोरदार राडा झाला, भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांना भिडले, प्रकरण शिविगाळ आणि मारहाणीपर्यंत पोहोचलं. या विषयासह राज्यात सुरू असलेल्या अनेक विषयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सविस्तर उत्तर दिली.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला. त्यातील एकजण भाजपचा कार्यकर्ता आहे हे खरआहे. मात्र, त्याच कुणी समर्थन करत नाही. आम्ही गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधच केला आहे. मात्र, असं आमचा कार्यकर्ता म्हणून म्हणून जर कुणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते योग्य नाही असं म्हणत कित्येक गुन्ह्यातील लोक हे राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा काँग्रेस पक्षाशी संबंधी आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Video : विषय पडळकर-आव्हाड राड्याचा पण, फडणवीसांनी जयंत पाटलांनाच सुनावलं

यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संस्कती संपली संपली असं लोक म्हणत आहेत. मात्र, महाराष्ट्रची संस्कृती कुठंच संपलेली नाही. आपल्याला फक्त अशा गोष्टी कोण पेरत आहे हे पाहण महत्वाचं आहे असं म्हणत संस्कृतीला मोठा धोका निर्माण झाल्याचं जे काही बोललं जातय ते चूक आहे असंही ते यावेळी म्हणाले. जी काही काल विधानसभेत घटना घडली त्याने आम्ही व्यथीतच झालेलो आहोत. असं कुठही होता कामा नये. त्याचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याने त्यांनी उचित कारवाई केली आहे असंही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथल्या बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहे, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करुन आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत. अशाप्रकारे समर्थन करणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

follow us