Video : तुम्ही अजितदादांच्या नावाने तीर सोडलायं पण, तेच…; शिंदेंसमोर फडणवीसांचा दादांना बुस्टर

मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे. त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करील. 

Dddd

Devendra fadnvis Jayant Patil

Devndra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच जयंत पाटलांच्या गुगलीला फडणवीसांनी अगदी सेफ उत्तर दिले. जयंत पाटील म्हणाले अलीकडेच एका मंत्र्यांने सांगितलं की मी देवेंद्र फडणवीसांचा लाडका मुख्यमंत्री आहे. तर आपल्या तीन लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा दोन उपमुख्यमंत्री सोडून. मी आता लाडका मंत्री योजना घोषित केली आहे. त्या योजनेच्या निकषात जे जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करील.

काही लोकांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची सवय असते पण तुम्ही एकदा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री झालात. तुम्ही अॅडजेस्ट झालात पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री होऊन अॅडजेस्ट झालेत का.. यावर फडणवीस म्हणाले, तुम्ही जो तीर सोडलात तो अजितदादांच्या नावाने सोडलात हे माझ्या लक्षात आलं. पण अजितदादा सगळे रेकॉर्ड तोडणारच आहेत. काही लोक त्यांना कायम उपमुख्यमंत्री म्हणतात पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असं काही नाही त्यांनी उपमुख्यमंत्रीच राहिलं पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे याच मताचे आम्हीही आहोत असे मध्येच जयंत पाटील म्हटल्यानंतर जोरदार हशा पिकला.

Video : जयंत पाटलांचा पवार-ठाकरेंबद्दल गोड प्रश्न; फडणवीसांच्या फोडणी देत उत्तराने ‘राजकीय’ ठसका

यानंतर फडणवीस पुढे म्हणाले, शिंदे साहेब असतील किंवा मी असेल आमच्यासाठी पद महत्वाचं नाही. ज्या पदावर असू त्याला न्याय द्यायचा हेच आमचे धोरण आहे. मी देखील मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री झालो तेव्हा पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्र्याचं जॅकेट घालून एक प्रकारे त्या भूमिकेत गेलो. आता शिंदे साहेबही मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले त्यांनीही आपला उपमुख्यमंत्र्‍याचा शर्ट घातला आहे. जी भूमिका मिळाली आहे ती भूमिका ते वठवत आहेत. महत्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. त्या खात्यांचं काम वेगात व्हावे यासाठी ते लक्ष घालत आहेत.

शिंदे साहेब विधानसभेत असतात. प्रश्नांची उत्तरे देतात आणि कधी कधी ते तुमच्या अंगावरही इतक्या जोराने जातात की तुम्हाला चूप करण्याचं कामही शिंदे साहेबच करतात अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

Exit mobile version