Video : जयंत पाटलांचा पवार-ठाकरेंबद्दल गोड प्रश्न; फडणवीसांच्या फोडणी देत उत्तराने ‘राजकीय’ ठसका

  • Written By: Published:
Video : जयंत पाटलांचा पवार-ठाकरेंबद्दल गोड प्रश्न; फडणवीसांच्या फोडणी देत उत्तराने ‘राजकीय’ ठसका

मुंबई : राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उद्धव ठाकरे आणि पवारांबद्दल एकच वाक्य बोलत तिखट फोडणी दिली आहे. त्यामुळे या वाक्याचा ठसका चांगलाच उठला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांचे (Sharad Pawar) जवळचे नेते जयंत पाटलांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी बोचरं उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं फडणवीस काय म्हणाले ते जाणून घेऊया. (Devendra Fadnavis On Sharad Pawar And Uddhav Thackeray)

मोदी सरकारच्या काळात इडीचा फक्त धाक; १० वर्षात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांवर गुन्हे, शिक्षा मात्र दोघांनाच

मुंबईतील राजभवन येथे काल (दि.19) ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. यात जयंत पाटलांनी वेडे-वाकडे प्रश्न विचारत फडणवीसांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीसांनी त्यांच्या शैलीत उत्तरेही दिली. या प्रश्नांच्या जुगलबंदीत जयंतरावांनी “शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांचे दोन-दोन वाक्यांमध्ये वर्णन कसे कराल” असा प्रश्न विचारला. त्यानंतर उपस्थितांनामध्ये हशा पिकला आणि नंतर काही सेकंदाच्या पॉज घेत फडणवीसांनी एकाच वाक्यात करू? असा प्रतिप्रश्न करत वाईट वाटून घेऊ नका असे विधान केले.

Video : रिल्स टाकणाऱ्या अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर सरकारच लक्ष; कारवाईबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

त्यावर जयंत पाटलांनी एक चालेले तुम्हाला डिस्काऊंट देतो असे म्हणत होकार दिला आणि पुढे फडणवीस म्हणाले काही भरवसा नाही. दोन्ही नेत्यांचे वेगवेगळे वर्णन करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. मात्र काही भरवसा नाही, या वाक्यातच दोन्ही नेत्यांचे वागणे येते, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

पतंगरावांनी केलेलं टीकवं म्हणजे झालं, जयंतरावांचा सल्ला घे; अजितदादांचा विश्वजित कदमांना टोला

भाजप मोठा शक्तिशाली पक्ष तरीही फोडाफोडी..

पवार आणि ठाकरेंबद्दल प्रश्न विचारल्यानंतर जयंत पाटलांनी फडणवीसांना गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षफोडीचा मुद्दा उपस्थित केला. भाजप आता सर्वात मोठा आणि शक्तिशाली राजकीय पक्ष झालेला आहे असे असतानाही दुसरे पक्ष फोडण्याचे काम का होतं? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले की, “जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट करत असतो, तेव्हा आपल्याकडे चार बोटं असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. समोरच्यांना फोडलेले पक्ष दिसतात, पण चोरलेला जनादेश दिसत नाही

आता दरवर्षी घोषित केला जाणार ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’; विधानसभा अध्यक्षांची घोषणा

…तर पक्षफोडीचा विषयच आला नसता

पक्षफोडीवर पुढे बोलतान फडणवीस म्हणाले की, जर 2019 ला लोकांनी दिलेला निकाल चोरला गेला नसता तर, नंतर पक्षफोडीचा विषयच आला नसता आणि आम्ही हे पक्ष फोडलेच नाहीत. या दोन्ही पक्षातील नेत्यांवर त्याच्या पक्षनेतृत्वाने ती वेळ आणल्याचेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube