CM Devendra Fadnavis Visits Latur: राज्यात अनेक भागांत पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी आज लातूर दौऱ्याला सुरुवात केली आहे. लातूरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.
मुख्यमंत्री फडणवीस लातूरसोबतच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिस्थितीचीही पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात विविध ठिकाणी शेतांमध्ये जाऊन पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि पावसाची परिस्थिती याबाबत माहिती घेतली जाणार आहे. तसेच स्थानिक शेतकरी आणि प्रशासनाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
राज्यातील काही भागांत पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये शासनाकडून मदत आणि उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
SS Retail IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री! 50 टक्क्यांहुन अधिक नफ्यासह लिस्ट झाला शेअर
लातूर, धाराशिव आणि सोलापूरमधील पाहणीनंतर संबंधित भागातील परिस्थितीचा अहवाल आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. यावेळी फडणवीसांनी प्रतिक्रियाही दिली.
फडणवीस काय म्हणाले
सरकारने दुष्काळ अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. शासन अशा परिस्थीतीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणार असून त्यासोबतच कर्जमाफीसुद्धा राबवली जात आहे. पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यांचही नियोजन केलं जाणार आहे.
