Download App

खुंटीचं हिंदुत्व वेशीला टांगलं : पाटणा दौरा, मुफ्तींची भेट अन्…; CM शिंदेंनी सगळचं काढलं

  • Written By: Last Updated:

मुंबई : आगामी लोकसभेत भाजपसह पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख 15 विरोधीपक्षांनी रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काल (दि. 23) पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीतून (Opposition Party Meeting) स्पष्ट झालं आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारदेखील उपस्थित होत. त्यानंतर आता ठाकरेंच्या बैठकीपासून ते हिंदुत्वाच्या विचार यावर ठाकरेंना भाजपसह शिंदे गटाकडून जोरदार टीकेच्या फैरी झाडल्या जात आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknat Shinde) एक ट्विट करत ठाकरेंना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करत अक्षरक्षः सगळचं उघडं केले आहे. (Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray )

विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”

शिंदेंच्या ट्विटमध्ये नेमकं काय?
कालच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंची लक्तरं काढत त्यांच्यावर अनेक गोष्टींचा दाखला देत हल्लाबोल केला आहे. शिंदे म्हणतात की, मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत.

सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत.

“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही. कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल. कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवाल शिंदेंनी ठाकरेंना उपस्थित केला असून, शिंदेंच्या या ट्विटला आता उद्धव ठाकरे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us