विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”

विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”

Opposition Parties Meet : आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी विरोधक एकवटले आहे. भाजपला धूळ चारण्यासाठी रणनीती काय असावी याबाबत विरोकांची काल (23 जून) बिहारची राजधानी पाटण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेससह, आम आदमी पक्ष आणि देशभरातील 16 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीतच विरोधकांच्या एकतेला पहिला तडा गेला आहे. विरोधी पक्षांच्या या बैठकीनंतर विविध नेत्यांमधील मतभेदांच्या बातम्या समोर येत आहेत. (After the meeting of opposition parties in Bihar’s Patna, news of Omar Abdullah clashed with Arvind Kejriwal)

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही मुद्द्यांवर विरोधकांच्या बैठकीत वाद झाला. यात दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसंदर्भात केंद्राने आणलेल्या अध्यादेश कारणीभूत ठरला आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केजरीवाल मागील अनेक दिवसांपासून करत आहेत. याच मागणीसाठी त्यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. पण काँग्रेसने त्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

व्यापाऱ्यांनी अडचण सांगताच राम शिंदेंची हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह; सभेतूनच थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन

याच मुद्द्यावरुन या बैठकीदरम्यान, केजरीवाल यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला. दिल्लीत अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांसाठी आणलेल्या अध्यादेशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये आधीच छुपा करार झाला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला. तर हा अध्यादेश संसदेत आणल्यानंतर काँग्रेस सभात्याग करेल, असा दावाही बैठकीत सामील असलेल्या आप नेत्यांनी केला.

केजरीवाल यांनी काँग्रेसवर आरोप करताच नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख ओमर अब्दुल्ला यांनी केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिले. अब्दुल्ला म्हणाले की,

जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले तेव्हा ‘आप’ने त्यांना (काश्मिरी नेत्यांना) पाठिंबा दिला नाही. त्यावेळी तुम्ही (अरविंद केजरीवाल) सरकारला (केंद्राला) पाठिंबा दिला होता.

अब्दुल्ला यांच्या या विधानमुळे सभेचे वातावरण तणावपूर्ण बनले. नेत्यांमध्ये पडलेली ठिणगी पाहून हा वाद मिटवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे पुढे सरसावले. ते म्हणाले, विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल, आपल्याला मतभेद मिटवायचे आहेत. यावेळी शरद पवार यांनी त्यांचा पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा संदर्भ दिला. ते म्हणाले,

“आम्ही 25 वर्षे एकमेकांवर टीका करत होतो. पण आम्ही सर्व मतभेद बाजूला ठेऊन आता एकत्र काम करत आहोत.”

यानंतर “आता मतभेद विसरून एकत्र येण्याची वेळ आली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, काल झालेल्या या बैठकीनंतर केजरीवाल लगेचच दिल्लीला निघून गेले.  नितीश कुमारांना ज्यावेळी हे विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की त्यांचे विमान निघणार होते म्हणून ते ताबडतोब निघून गेले.

अधीर रंजन यांच्या वक्तव्यावर गदारोळ

विरोधी पक्षांची बैठक सुरू असताना काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. ममता बॅनर्जींवर निशाणा साधत ते म्हणाले, “ पश्चिम बंगाल तुम्हाला काँग्रेस मुक्त करायचे आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी उभे राहू? हे अशक्य आहे, पूर्णपणे अशक्य आहे.” अधीर रंजन पुढे म्हणाले, “पश्चिम बंगालमधील काँग्रेसने ममता बॅनर्जींना खूश करण्यासाठी कधीही राजकारण केले नाही आणि कधीही करणार नाही.”

‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

बंगालमधील पंचायत निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात काँग्रेसने ममता सरकारचा निषेध केला होता. यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, काँग्रेसला मोठे मन दाखवावे लागेल, आपणच जर आपसात लढलो तर भाजपला फायदा होईल. यावर अधीर रंजन चौधरी यांनी त्यांना उत्तर देत म्हंटले होते की, “हो दीदी, काँग्रेसशिवाय भारतात काहीही होणार नाही आणि ही गोष्ट जर तुमच्या शक्य तितक्या लवकर लक्षात आली तर ते तुमच्यासाठी चांगले होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube