‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

‘उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका, ते तुमचंच भूत’; फडणवीसांवर राऊतांचा पलटवार

बिहारची राजधानी पाटण्यात काल विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. उद्धव ठाकरे चक्के जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.

व्यापाऱ्यांनी अडचण सांगताच राम शिंदेंची हॉटलाईन अ‍ॅक्टिव्ह; सभेतूनच थेट केंद्रीय मंत्र्यांना फोन

त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसले म्हणून काल म्हणे देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. त्यांना इतकंच सांगू इच्छितो की काश्मीर हा हिंदुस्तानचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही स्वतः मेहबुबा मुफ्तींबरोबर अडीच वर्ष सरकार चालवलं आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही होतात. मुफ्ती यांच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान उपस्थित होते. त्यामुळे अशी टीका करताना जर जपून करा.

ते पुढे म्हणाले, आम्ही नवाज शरीफांचा केक कधी कापायला गेलो नाही. किंवा त्यांच्या सरकारमध्ये सामील झालो नाही. भविष्यात यावर अधिक चर्चा करू. उद्धव ठाकरे आज कदाचित यावर सविस्तर बोलतील. उगाच तोंडाच्या वाफा दवडू नका. तुमचंच भूत आहे ते आणि तुमचंच पाप आहे, अशी जळजळीत टीका राऊत यांनी केली.

Patna Meeting : बैठकीनंतर विरोधकांचं पुढचं पाऊल काय? नितीश कुमारांनी सांगून टाकलं…

काय म्हणाले होते  फडणवीस?

विरोधकांच्या बैठकीवर टीका करताना फडणवीस म्हणाले होते, की आपला परिवार वाचविण्यासाठी विरोधकांची आघाडी तयार करण्यात येत आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर भाजपने जम्मू काश्मिरात भाजपने सरकार स्थापन केले होते हे खरे आहे. त्यावरून सातत्याने भाजपला टोमणे मारणारे उद्धव ठाकरे स्वतःच मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करत होते, त्याचे आश्चर्य वाटले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube