Cm Eknath Shinde Vs Udhav Thackeray : शिवसेनेची संपत्ती आणि मालमत्तेवर आम्ही दावा करणार नाही पण विरोधकांना पैशांबद्दल प्रेम असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. विधासभेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘तेव्हा शासन आपल्या दारी नाही, तर आपल्या घरी होतं; CM शिंदेंकडून ठाकरेंचा समाचार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळालं आहे. शिवसेनेची संपत्ती आणि मालमत्ता मागण्याचा कोणाकडेच नैतिक अधिकार नाही. तरीही आम्ही कोणत्याही संपत्ती आणि मालमत्तेवर दावा करणार नसल्याची ग्वाहीच मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
हिंदू मुलींच्या संरक्षणार्थ नितेश राणे धावले, उंबरे धर्मांतर प्रकरणी उद्या राहुरीत जनआक्रोश मोर्चा…
तसेच विरोधकांनी मालमत्तेची मागणी केल्यानंतर आम्ही तत्काळ संपत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांना शिवसेना आणि बाळासाहेबांबद्दल प्रेम नाही तर फक्त पैशांबद्दल प्रेम असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. तसेच बाळासाहेबांचे विचारच आमची खरी संपत्ती असल्याचं ते म्हणाले आहेत.
https://letsupp.com/mumbai/mumbai-crime-bike-rider-attacks-police-team-with-knife-74654.html
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर टीकेची तोफ डागल्यानंतर माध्यमांशी बोलतानाही त्यांनी ठाकरेंना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, आज 50 आमदार, 13 खासदार विधानपरिषदेचे आमदार, हजारो नगरसेवक बाळासाहेबांच्या भूमिकेबरोबर आहेत, याचं त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभेत बोलतानाही मुख्यमंत्री शिंदे उद्धव ठाकरेंवर चांगलेच बरसल्याचं पाहायला मिळाले आहेत. ते म्हणाले, काही काळापूर्वीही योजना होत्या, पण त्यासाठी खूप फेऱ्या माराव्या लागायच्या. एवढी कटकट होती आणि एवढे खेटे घ्यावे लागायचे की, लोक ते काम सोडून द्यायये. कारण त्यावेळी शासन आपल्या दारी नाही, तर शासन आपल्या घरी होतं, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.