Download App

आदित्य ठाकरेंच्या जन्माआधी… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचंय, त्यांची विधाने प्रतिक्रिया देण्याइतपत प्रगल्भ नसल्याचा टोला उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही आदित्य ठाकरेंच्या जन्माआधी काम करत असल्याचा टोला लगावला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते.

भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक पाकिस्तानी घुसखोर ठार

मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा होती. अखेर आज मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रीरामाचं दर्शन घेतलं आहे. शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरुन विरोधकाकडून टीकेची झोड उठली होती.

Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूची अॅलर्जी होतेय!

रावणाचे राज्य चालवणारे लोकं अयोध्येला जात असल्याचं माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्यावारीवरुन टीका केली होती. त्यानंतर आज श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे.

अयोध्यावारीत मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यात असून त्यांच्यासमवेत आमदार, खासदारांसह इतर भाजप नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान, हनुमान गढी इथल्या सभेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राकडे परतले आहेत.

Tags

follow us