Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूची अॅलर्जी होतेय!

  • Written By: Published:
Sharad Pawar Eknath Shinde

Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे टीका करायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर बांधलं आणि तारीख देखील सांगितली आहे. त्यामुळे पहिले मंदिर फिर सरकार हे बोलणारे कुठे आहेत? असे आरोप करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील शरद पवार, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते.

Eknath Shinde : राम मंदिर हिंदुत्वाचे प्रतिक… बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले! – Letsupp

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी आज अयोध्येयत जरी असलो तरी महाराष्टमधील पावसाच्या नुकसानीबाबत सकाळपासून जिल्हाधिकारी यांच्या सोबत संपर्कात आहे. मी त्यांना सूचना दिल्या आहेत. मी घरात बसून काम करत नाही. जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन पंचनामे करायला सांगितले आहे.

राज्यात काही जणांना हिंदू धर्माची, हिंदुत्वाची अलर्जी झाली आहे. काही जण सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात आम्ही सावरकर गौरव यात्रा काढली आणि चोख उत्तर दिले आहे. भारत जोडो की भारत तोडो यात्रेत सहभागी होणाऱ्यांना या देशातील जनता धडा शिकवेल, असा देखील आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube