Cm Eknath Shinde : लोकांच्या कामासाठी थकतच नाही…

औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]

Untitled Design

Untitled Design

औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला उर्जा देत राहते. राज्याच्या विकासासाठी आणि ॉजनतेच्या आशा, आकांक्षा पुर्ण करण्यासाठी काम करतांना एक वेगळा आनंद, समाधान मिळतंय, त्यामुळे थकवा कधीच जाणवत नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.

Maharashtra Politics : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांच्या जावयाला अटक

उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्यातील कार्यक्रम आटोपून शिंदे रात्री अकरा वाजता औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर आले होते. रात्री पावणे बारा वाजता त्यांच्या हस्ते हॉटेलचे उद्घाटन झाले. त्यानंतर ते चिकलठाणा विमानतळावरून ते एक वाजेच्या सुमारास पुण्याला गेले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. राज्यातील पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्याने बोलाविल्यास ते कोणत्याही पदाधिकाऱ्याला नाराज करीत नाहीत. त्यांच्या दौऱ्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर अनेकजण थक्क झाले आहेत.

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबदेत अनेक दौरे झाले आहेत. त्यांच्या कामाचा हा वेग सगळ्यांनाच थक्क करायला लावणारा आहे. एवढी उर्जा त्यांना मिळते कुठून याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे, पण जनतेकडूनच आपल्याला ही उर्जा मिळते, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version