Download App

‘तुमच्या विधानाचा बदला जनता घेणारच’; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना ठणकावून सांगितलं…

'तुमच्या विधानाचा बदला जनता घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Image Credit: letsupp

Cm Eknath Shinde On Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांच्या (Vijay Wadettivar) विधानाचा बदला जनता घेणारच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना (Hemant Karkare) लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने (RSS) झाडली होती, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर देशातील राजकारण चांगलचं ढवळून निघालं. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘नाशकात भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा, दोन दिवसांत खुलासा करू’ : संजय राऊत

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विजय वडेट्टीवार यांचं विधान दुर्देवी असून देशातल्या प्रत्येक नागरिकाला संताप आणणारं विधान त्यांनी केलं आहे. देशासाठी ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा हा अपमान आहे. काँग्रेस नेत्यांना मुंबईकरांच्या मृत्यूची चिंता नाही पण कसाबच्या अपमानाची चिंता आहे. 26/11 च्या हल्ल्यात ज्या पोलिसांनी आपलं शौर्य गाजवलं त्यांचा अपमान करणारं हे विधान असून काँग्रेसकडून शहीदांचा अपमान करण्यात आलायं. या अपमानाचा बदला जनता घेणारच असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

26/11 च्या हल्ल्यावेळी अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल पण घेतला नाही कारण तेव्हा मोदींचं सरकार नव्हतं. मोदींचं सरकार आल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्टाईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत असल्याचं दाखवून दिलं. या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून भारत घुसून मारणार असं भारताने दाखवून दिलं, असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

रणजितसिंह निबाळकरांचं कोणी काही वाकडं करू शकत नाही, फडणवीसांचा शरद पवारांना निशाणा

एक जाहिरात प्रसिद्ध केली त्यात म्हणलं की तुमच्या मतांमुळे कुठे जल्लोष व्हायला हवा भारतात की पाकिस्तानात? यात काँग्रेस कुठेचं काही म्हटलं नाही मग तक्रार करण्याचं कारण काय? यामध्ये काँग्रेस नाही तर काँग्रेसने मनाला लावून घेण्याचं कारण काय? याचा अर्थ काँग्रेसच्या मनात चांदण आहे. पाकिस्तानने म्हटलं होतं की कसाबच्या गोळीने करकरेंचा मृत्यू झाला नाही पण कसाब पाकिस्तानचा हे त्यांनी मान्य केलं. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेस काहीही विधाने करु शकतो, 370 च्यावेळीही म्हटले होते पण काहीही झालं नाही, अशी सडकून टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलीयं.

काय म्हणाले होते वडेट्टीवार?
ज्यावेळेस हेमंत करकरे यांचा खून झाला ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती. कुठल्या अतिरेक्याची नव्हती. तर ती गोळी एका आरएसएस समर्पित अधिकाऱ्याची होती. त्यावेळचे पुरावे लपवणारा जो कुणी देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला जर भारतीय जनता पार्टी तिकीट देत असेल तर देशद्रोह्यांना पाठिशी घालणारा हा पक्ष आहे का असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला.

follow us

वेब स्टोरीज