Download App

धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार?, सीएम फडणवीस अन् अजित पवारांची रात्री बैठक, आजच निर्णय?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मंगळवार सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं

  • Written By: Last Updated:

CM Fadnavis and Ajit Pawar Meeting : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर राज्यात भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात काल रात्री सुमारे दोन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही. (Pawar) धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झालेली आहे, अशी माहिती मिळत आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येचा अखेर उलगडा! काळजाचा थरकाप उडणारा तो क्रूर व्हिडिओ सीआयडीच्या हाती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री देवगिरी बंगल्यावर 8.50 वाजता बैठक सुरु झाली. त्यानंतर साडे दहा वाजता ही बैठक संपली. या दीड तासात नेमकं काय चर्चा झाली, मात्र याचा तपशील समोर आलेला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती. हे अधिवेशन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरुन गाजणार असल्याती शक्यता आहे.

दमानिया गौप्यस्फोट करणार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मंगळवार सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटले आहे. सकाळी साडेनऊ वाजता मी माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर दमानिया काय गौप्यस्फोट करणार याकडे याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना ज्या क्रूरपद्धतीने मारण्यात आलं. त्या मारहाणीचे फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. देशमुख यांच्या हत्येचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हाती आले आहेत. या फोटोमध्ये संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचेही फोटो समोर आले आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धागे उलगडू लागले आहेत वाल्मीक कराड हा येथील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने तोच खुनी असल्याचेही आता समोर आले आहे. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे खुद्द मुंडे यांनीच सुरुवातील सांगितले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

follow us